IND vs ENG : हैदराबाद कसोटीत या पाच चुका टीम इंडियाला पडल्या महागात, जाणून घ्या काय त्या

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला पराभवाचं पाणी पाजलं. पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेऊनही काहीच फायदा झाला नाही. उलट कसोटीच्या चौथ्या दिवशी 28 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपमध्ये दुसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

| Updated on: Jan 29, 2024 | 8:04 PM
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियावर दुसरा सामना जिंकून बरोबरी साधण्याचं दडपण असेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी टक्केवारी सुधरवण्यासाठी उर्वरित चार सामने जिंकावे लागतील. असं असलं तरी भारताच्या काही चुकांमुळे पहिला सामना गमवण्याची वेळ आली. पाच चुका टीम इंडियाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या.

1 / 6
इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये बेझबॉल रणनिती अवलंबली आहे. त्यामुळे इंग्लंडची रणनिती अनेकदा प्रतिस्पर्धी संघाला मारक ठरते. पहिल्या डावात आघाडी मिळवूनही इंग्लंडने आपली रणनिती काही सोडली नाही. ओली पोपने 196 धावांची झुंजार खेळी केली. तसेच टॉप हार्टलीने 26.2 षटकात 62 धावा देत 7 गडी टिपले.

2 / 6
टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. कारण इंग्लंडचा संघ 246 धावांवर तंबूत परतला होता. यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि जडेजाने डाव सावरला खरा पण संघाच्या धावसंख्येत मोठी भर घालण्यात अपयश आलं. जर पहिल्या डावात टीम इंडियाने 550 ते 600 धावा केल्या असत्या तर चित्र वेगळं असतं.

3 / 6
टीम इंडियाचं पराभवाचं दुसरं कारण ठरलं ते गचाळ क्षेत्ररक्षण..इंग्लंडचे फलंदाज गोलंदाजांवर हावी होत असताना क्षेत्ररक्षकही साजेशी कामगिरी करत नव्हते. मोहम्मद सिराज आणि आर अश्विनने क्षेत्ररक्षणात अक्षरश: माती खाल्ली. तर अक्षर पटेलने ओली पोपचा सर्वात सोप झेल सोडला. 110 धावांवर बाद झाला असता पण त्यात आणखी 86 धावांची भर पडली.

4 / 6
रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना सूर सापडत नाही. दोन्ही डावात बोटावर मोजल्या जातील इतक्या धावा करून तंबूत परतले. त्यामुळे संघाच्या इतर फलंदाजांवर दडपण वाढलं. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांचा मनोबळ यामुळे वाढलं.

5 / 6
कसोटीत रोहित शर्माची कर्णधारपदाची कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ओली पोप फटकेबाजी करत असताना कर्णधार रोहित शर्मा हतबल होत सर्व पाहात होता. क्षेत्ररक्षणही नीटसं लावलं नसल्याची टीका क्रीडाप्रेमी करत आहेत.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.