IND vs SL: धर्मशालातले आकडे भारताविरोधात, पहिल्या T20 विजयाची प्रतीक्षा, श्रीलंकेसाठी मौका-मौका!

भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे 10 डिसेंबर 2017 रोजी सामना खेळवण्यात आला होता. या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला गेला आणि श्रीलंकेने केवळ 20.4 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.

| Updated on: Feb 26, 2022 | 10:54 AM
श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) टीम इंडियाने पाहुण्यांची धुळधाण उडवली.  लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, आता टीम इंडियासमोरचं आव्हान मोठं आहे. कारण टीम इंडियाला आता त्या मैदानावर सामना खेळायचा आहे जिथे ते कधीही जिंकू शकले नाहीत. यासोबतच श्रीलंकेनेही टीम इंडियाला (Team India) तिथे धूळ चारली आहे. T20 मालिकेतील पुढील सामना धर्मशाला (India vs Sri Lanka, 2nd T20I) येथे खेळवला जाणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर शनिवारी हा सामना होणार आहे.

1 / 5
भारताने धर्मशाला येथे आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या 6 सामन्यांपैकी एकच सामना T20 फॉरमॅटचा होता, जो भारताने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

2 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे 10 डिसेंबर 2017 रोजी सामना खेळवण्यात आला होता. या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला गेला आणि श्रीलंकेने केवळ 20.4 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. म्हणजे श्रीलंकेने टीम इंडियाचा 176 चेंडूत पराभव केला, हा यजमानांचा मोठा पराभव होता. धर्मशालामध्ये त्या दिवशी टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. पहिल्या 5 फलंदाजांना दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. विशेष म्हणजे त्या सामन्यात रोहित शर्मा कर्णधार होता.

3 / 5
धर्मशाला येथे पावसामुळे भारताचे मागील 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. पावसामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेकदेखील झाली नाही.

4 / 5
भारतीय संघ आज धर्मशाला येथे पहिला T20 विजय नोंदवण्यासाठी उतरेल. जर टीम इंडिया ही कामगिरी करु शकली नाही तर भारताचा विजयरथ थांबेल. भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या 16 T20 सामन्यांमध्ये श्रीलंकेला 12 पराभव पत्करावे लागले आहेत. त्याच वेळी, श्रीलंकेला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.  (फोटो: BCCI/AFP/AP)

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.