IND vs SL: अवघ्या 3 दिवसांत श्रीलंकेचं टीम इंडियासमोर सरेंडर, जाणून घ्या भारताच्या विजयाची 4 कारणं

टी-20 सीरीज प्रमाणे कसोटी मालिकेवरही (Test Series) भारताचं वर्चस्व कायम आहे. मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्याचा (Mohali Test) अवघ्या तीन दिवसात निकाल लागला. भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja).

| Updated on: Mar 06, 2022 | 5:46 PM
टी-20 सीरीज प्रमाणे कसोटी मालिकेवरही (Test Series) भारताचं वर्चस्व कायम आहे. मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्याचा (Mohali Test) अवघ्या तीन दिवसात निकाल लागला. भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja). त्याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारताने या विजयाची नोंद केली. रवींद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर रवींद्र जाडेजाना दोन्ही डावात मिळून एकूण 9 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या हळूहळू फिरकीला अनुकूल होत जाणाऱ्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला. आज कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कालच्या चार बाद 108 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 174 धावात ऑलआऊट झाला. श्रीलंकेच्या उर्वरित सहा फलंदाजांनी फक्त 66 धावांची भर घातली. फॉलोऑन लादल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. दुसऱ्या डावात श्रीलंकेला सर्वबाद 178 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात भारतीय संघाच्या चार जमेच्या बाजू होत्या, ज्यामुळे भारतासमोर श्रीलंकेने सपशेल सरेंडर केलं. चला तर मग जाणून घेऊयात भारताच्या विजयामागची चार कारणं.

1 / 5
भारतीय गोलंदाजी - टीम इंडियाची फलंदाजी सुरू असताना पहिले दोन दिवस खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत नसल्याचे दिसून आले. पण जेव्हा खेळपट्टी गोलंदाजांना मदत करु लागली आहे हे लक्षात आले तेव्हा भारताने डाव घोषित केला आणि श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाजांनीही विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांनी मिळून पाच विकेट घेतल्या. दुसरीकडे, रवींद्र जडेजा आणि आर अश्विनच्या फिरकीला श्रीलंकेच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते.

2 / 5
टीम कॉम्बिनेशन - मोहाली कसोटीत भारतीय संघ तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. तर श्रीलंकेने तीन वेगवान गोलंदाज खेळवले. मोहालीची खेळपट्टी ज्या पद्धतीची होती त्यावरून श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेचा निर्णय चुकल्याचे स्पष्ट झाले. वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराच्या दुखापतीनेही संघाचं नुकसान झालं आणि श्रीलंकेला दुसऱ्या दिवशी पार्ट टाईम गोलंदाजांकडे चेंड़ू सोपवावा लागला. त्याचबरोबर भारताने तीन फिरकीपटू खेळवले. मात्र, केवळ अश्विन-जडेजालाच विकेट मिळाल्या. जयंत यादवला यश मिळाले नाही, मात्र त्याने धावा देण्यात कंजुषी दाखवली.

3 / 5
नाणेफेक जिंकणं - भारतीय खेळपट्ट्यांवर नाणेफेक खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्याने भारताला फायदा झाला. त्यामुळे भारताने मोठी धावसंख्या उभारून श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. मोहालीच्या ताज्या खेळपट्टीवर भारताने आरामात धावा केल्या आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांना स्थिरावू दिले नाही.

4 / 5
जडेजाची अष्टपैलू कामगिरी, अश्विनची साथ - पहिल्या डावात रवींद्र जडेजाने नाबाद 175 धावांची खेळी करत भारताला 574 धावांपर्यंत मजल मारुन दिली. त्यानंतर त्याने गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याच्या वळणाऱ्या चेंडूंनी श्रीलंकेचा घात केला. त्याने पहिल्या डावात एकट्याने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. 13 षटकात 4 निर्धाव षटकांसह 41 धावा असं त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण होतं. रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली. पहिल्या डावात श्रीलंकेकडून पाथुम निसांकाने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताकडे 400 धावांची मोठी आघाडी होती. त्यामुळे फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. जो गोलंदाजांनी पूर्णपणे योग्य ठरवला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. दुसऱ्याडावातही अश्विन-जाडेजाच्या फिरकी समोर लंकन फलंदाजांनी गुडघे टेकले. दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात डिकवेलाने एकट्याने नाबाद अर्धशतकी (51) खेळी केली. भारताने या कसोटीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताने एक डाव आमि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा डे-नाईट कसोटी सामना असून तो बँगलोरला खेळवला जाणार आहे.

5 / 5
Follow us
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.