IND vs SL : तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारताने या चुका सुधारणं आवश्यक, अन्यथा…

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या दोन सामन्यातून धडा घेत चुका सुधारणं गरजेचं आहे. नाही तर तिसऱ्या सामन्यातही पराभवाचं तोंड पाहावं लागू शकतं.

| Updated on: Aug 05, 2024 | 8:09 PM
भारताने टी20 मालिकेत श्रीलंकेला लोळवलं. पण वनडे मालिकेत त्याच्या विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आणि चांगली सुरुवात करूनही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे वनडे मालिका गमवण्याची वेळ आली आहे.

1 / 5
दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला 208 धावांत गुंडाळले आणि 32 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा होता. पण काही चुकांमुळे पराभवाची किंमत मोजावी लागली. आता तिसऱ्या वनडेपूर्वी भारताने तीन चुका सुधारणं गरजेचं आहे.

2 / 5
कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाज आक्रमणाऐवजी बचावात्मक पवित्र्यात दिसले. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी  भारताच्या 5 विकेट एलबीडब्ल्यू करून घेतल्या.

3 / 5
कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करत आहे. याची पूर्ण कल्पना श्रीलंकेच्या खेळाडू आणि प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांना आहे. त्यामुळे श्रीलंका 5 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरते. पण भारतीय संघ फिरकी गोलंदाजीवर विसंबून न राहता आहे तोच संघ खेळवत आहे.

4 / 5
भारताच्या ताफ्यात रियान परागसारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याने टी20 मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. पण त्याच्याऐवजी शिवम दुबेला संघात स्थान दिलं गेलं. शिवम दुबे आतापर्यंत या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.