IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरचा नको त्या यादीत समावेश, यश दयालनंतर टाकलं सर्वात महागडं षटक
IPL 2023 PBKS vs MI : अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2023 मधील दुसरं महागडं षटक टाकलं आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. यापूर्वी गुजरातच्या यश दयाने 31 धावा दिल्या होत्या. या यादीत कोण कोण आहे वाचा
Arjun TendulkarImage Credit source: BCCI/IPL
Follow us
आयपीएल इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा मान आरसीबीच्या हर्षल पटेलच्या नावावर आहे. आयपीएल 2021 स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात त्याने एका षटकात 37 धावा दिल्या होत्या. (Photo – IPL/BCCI/Twitter)
आयपीएल 2011 मध्ये प्रशांत परमेश्वरन याने 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध महागडं षटक टाकलं होतं. कोची टस्कर्स केरळकडून खेळताना एका षटकात 37 धावा दिल्या होत्या. (Photo – IPL/BCCI/Twitter)
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या डॅनियल सॅम्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात एका ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या होत्या. (Photo – IPL/BCCI/Twitter)
आयपीएल 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या परविंदर अवानाने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात एका षटकात 33 धावा दिल्या होत्या. (Photo – IPL/BCCI/Twitter)
आयपीएल 2010 मध्ये रवी बोपारा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. रवी बोपाराने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या एका सामन्यात 33 धावा दिल्या होत्या. (Photo – IPL/BCCI/Twitter)
आयपीएल 2012 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना पुणे वॉरियर्सच्या राहुल शर्माने एका षटकात 31 धावा दिल्या होत्या. (Photo – IPL/BCCI/Twitter)
आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना यश दयालने एका षटकात 31 धावा दिल्या. रिंकू सिंहने त्याला एका षटकात पाच षटकार ठोकले. (Photo – IPL/BCCI/Twitter)
अर्जुनने पंजाब किंग्सविरुद्ध तब्बल 31 धावा दिल्या. यामुळे अर्जुन टीकेचा धनी ठरलाय. अर्जुनने या ओव्हरमध्ये एकूण 8 बॉल टाकले. अर्जुनने या ओव्हरमध्ये अनुक्रमे 6, wd,4,1,4, 6, 4nb आणि 4 अशा एकूण 31 धावा दिल्या.