AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakshya Sen : घरातूनच बॅडमिंटनचा वारसा, एकाच सामन्यात प्रकाश पदुकोण बनले जबरा फॅन, कसा होता लक्ष्यचा प्रेरणादायी प्रवास?

भारताच्या युवा शटलर लक्ष्य सेनची (Lakshya Sen) सध्या जगभर चर्चा आहे. या युवा बॅटमिंटनपटूने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship Final 2022) अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली.

| Updated on: Mar 21, 2022 | 12:13 PM
Share
बॅडमिंटन कोर्टवर आपल्या अप्रतिम खेळाने दिग्गजांना भुरळ पाडणाऱ्या भारताच्या युवा शटलर लक्ष्य सेनची (Lakshya Sen) सध्या जगभर चर्चा आहे. या युवा बॅटमिंटनपटूने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship Final 2022) अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली. मात्र फायनलमध्ये त्याला पराभूत व्हावं लागलं. रविवारी, 20 मार्च रोजी बर्मिंघम एरिना येथे खेळवण्यात आलेल्या ऑल इंग्लंड पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय स्टारला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या दिग्गज खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेनने (Viktor Axelsen Beats Lakshya Sen) लक्ष्य सेनचा 21-10, 21-15 असा पराभव केला. भारतीय स्टारने आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी जिंकू दिले नाही, त्याने व्हिक्टरला कडवी झुंज दिली.   (BAI Twitter)

1 / 5
लक्ष्यने किताब गमावला, पण जगभरात नाव कमावलं. सध्या देशभरात लक्ष्य सेनचीच चर्चा आहे. लक्ष्य सेनचा जन्म 16 ऑगस्ट 2001 रोजी अल्मोडा येथे झाला. बॅडमिंटन हा खेळ लक्ष्यला वारशाने मिळाला आहे. अल्मोडा येथे त्याचे आजोबा त्यांच्या बॅडमिंटन खेळामुळे खूप प्रसिद्ध होते. त्याच वेळी, त्याचे वडील डीके सेन हेदेखील प्रसिद्ध बॅटमिंटनपटू होते. डीके सेन हे लक्ष्यचे बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. लक्ष्यचा मोठा भाऊ चिराग हादेखील त्याच्या बॅटमिंटन खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. लक्ष्य अवघ्या नऊ वर्षांचा असताना तो पहिल्यांदा वडिलांसोबत त्याच्या भावाची सब-ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. तिथेच त्याने बॅडमिंटनपटू होण्याचा निर्धार केला.   (BAI Twitter)

2 / 5
लक्ष्यने अकादमीच्या चाचण्यांमध्ये विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण या दोघांनाही प्रभावित केले. त्यांनी लक्ष्यला अकादमीत बोलावले. लक्ष्यसोबत त्याचे आजोबा आणि वडीलही अल्मोडा सोडून बंगळुरूला आले. घरच्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यासाठी एवढा मोठा त्याग केल्याने त्याचे ध्येय पूर्ण झाले. लक्ष्यच्या कारकिर्दीवर त्याच्या वडिलांचा मोठा प्रभाव आहे. बॅडमिंटन प्रशिक्षक डीके सेन यांनी आपल्या लाडक्या मुलाला शिस्तीचे धडे दिले आणि प्रशिक्षणापासून ते सराव सत्रांपर्यंत प्रत्येक गोष्टीला गांभीर्याने घेण्यास शिकवले. वडिलांमुळेच लक्ष्यच्या कारकिर्दीचा पाया भक्कम झाला. (BAI Twitter)

3 / 5
लक्ष्यने 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील आणि नंतर 19 वर्षांखालील गटांमध्ये विजेतेपदं मिळवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर, 2018 च्या यूथ ऑलिम्पिकमध्ये त्याने पहिल्यांदाच हेडलाइन्समध्ये स्थान मिळवले, अवघ्या 17 वर्षीय लक्ष्यने यूथ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत तो चीनच्या शिफेंग लीकडून पराभूत झाला पण मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला. त्याच वर्षी त्याने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्येही पदके जिंकली. (BAI Twitter)

4 / 5
गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून तो एकापाठोपाठ एक स्पर्धा जिंकत आहे आणि या काळात त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना पराभूत केलं आहे. डिसेंबरमध्ये, तो वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याचवेळी त्याने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने इंडिया ओपनमध्ये वर्ल्ड चॅम्पियन लोह कीनचा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि आता त्याने ऑल इंग्लंडमध्ये उपविजेतेपद मिळवले. (BAI Twitter)

5 / 5
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.