वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा असा होता प्रवास, पहिल्याच सामन्यात भारताला दिलेला दणका

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार अखेर संपला आहे. गेल्या 18 दिवसांपासून सुरु असलेलं वर्ल्डकपचं वादळ शमलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान काय दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही.

| Updated on: Oct 20, 2024 | 10:47 PM
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. पहिल्या जेतेपदासाठी टीम इंडिया उत्सुक होती. पण त्यांच्या आशा पहिल्याच सामन्यात मावळल्या. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 160 धावा केल्या. तसेच भारताला 102 धावांवर गुंडाळलं आणि 58 धावांनी विजय मिळवला.

1 / 6
दुसऱ्या साखळी फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियने विजयासाठी 20 षटकात 8 गडी गमवून 148 धावा दिल्या होत्या. पण न्यूझीलंडला 88 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना ऑस्ट्रेलियाने 60 धावांनी जिंकला.

2 / 6
तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला 8 विकेट आणि 15 चेंडू राखून पराभूत केलं. श्रीलंकेने 20 षटकात 5 गडी गमवून 115 धावा केल्या आणि विजयासाठी 116 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान न्यूझीलंडने 17.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं.

3 / 6
चौथ्या सामन्यात पाकिस्तानशी लढत झाली. या सामन्यात खरं तर न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने 20 षटकात 6 गडी गमवून 110 धावा केल्या. पण पाकिस्तानला 56 धावांत गुंडाळण्यात यश आलं. न्यूझीलंडने हा सामना 54 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरी गाठली.

4 / 6
उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना अतितटीचा झाला. न्यूझीलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 128 धावा केल्या. हा धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 8 धावा तोकड्या पडल्या. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 गडी गमवून 120 धावा केल्या.

5 / 6
अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं  आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेने चांगली सुरुवात केली. मात्र नंतर डाव गडगडला आणि न्यूझीलंडने विजय मिळवला.  (सर्व फोटो- न्यूझीलंड ट्विटर)

6 / 6
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.