NZ vs BAN : केन विलियमसन याच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता काय केलं ते वाचा

| Updated on: Oct 13, 2023 | 11:16 PM

NZ vs BAN : न्यूझीलंडची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला असून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. तर कर्णधार केन विलियमसन याने विक्रमांची नोंद केली आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 11 वा सामना न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात पार पडला. बांगलादेशने फलंदाजी करत 50 षटकात 9 गडी गमवून 245 धावा केल्या. न्यूझीलंडने हे लक्ष्य 2 गडी गमवून 42.5 षटकात पूर्ण केलं. (Photo- Twitter)

2 / 6
न्यूझीलंडने तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला. यासह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडचे 6 गुण झाले असून फक्त सामने जिंकताच उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होणार आहे.  (Photo- Twitter)

3 / 6
न्यूझीलंडला डेवॉन कॉनव्हे आणि केन विलियमसन यांची चांगली भागीदारी केली. डेवॉन कॉनव्हेनं 45, तर कर्णधार केन विलियमसननं 78 धावा केल्या.  (Photo- Twitter)

4 / 6
विलियमसन रिटायर्ड हर्ट झाला. विलियमसनने सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. विलियमसनने आयपीएल 2023 मध्ये क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता.  (Photo- Twitter)

5 / 6
विलियमसन या सामन्यात काही विक्रम नोंदवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक 50 हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.  (Photo- Twitter)

6 / 6
आयसीसीच्या लिमिटेड षटकांच्या स्पर्धेत सर्वाधिक 50 हून अधिक धावा करण्याचा मान त्याला मिळाला आहे. दुखापतीमुळे विलियमसन सुरुवातीचे दोन सामने खेळला नव्हता.  (Photo- Twitter)