RCB vs SRH IPL 2023 : रनमशीन विराट कोहली याला हैदराबाद विरुद्धच्या आरपारच्या सामन्याआधी सतावतेय मोठी भीती
IPL 2023 : आतापर्यंत कोहलीने हैदराबादविरुद्ध एकूण 20 सामने खेळले आहेत. या सामन्यात 136.8 च्या स्ट्राइक रेटने 31.6 च्या सरासरीने 569 धावा केल्या आहेत.
Follow us
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे सामना आहे. हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफमधील सर्वात महत्त्वाचा सामना आहे.
या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहलीच्या सर्व चाहत्यांना त्याच्याकडून शानदार खेळीची अपेक्षा आहे. पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड पाहता चाहत्यांना चिंता लागली आहे.
हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या दोन डावात कोहली गोल्डन डकवर बाद झाला. कोहलीने हैदराबादविरुद्ध एकूण 20 सामने खेळले असून, त्याने 136.8 च्या स्ट्राइक रेटने आणि 31.6 च्या सरासरीने 569 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीची हैदराबादविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 93 आहे.
हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या 20 सामन्यात कोहली तीन वेळा खाते न उघडता शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात कोहली बॅट तळपली नाही तर आरसीबीला मोठा झटका बसणार आहे.
प्ले ऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीला त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. हैदराबादनंतर आरसीबीचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे.