Salil Ankola: 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती, मग बॉलिवूड गाजवलं, आता मुंबई क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी

सलीलने सचिनसोबत पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ही त्याची पहिली आणि शेवटची कसोटी ठरली. त्यानंतर तो भारताकडून कसोटी खेळला नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात सलीलने 19 षटकात 93 धावांत एक विकेट घेतली.

| Updated on: Mar 01, 2022 | 3:44 PM
सचिन तेंडुलकरने (Sachin TendulkaR) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तो दिवस सर्वांच्या लक्षात असेल. 15 नोव्हेंबर 1989 ही तारीख होती जेव्हा सचिनने पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात मुंबईच्या आणखी एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते पण त्याला सचिनसारखी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याला सचिनसारखी प्रसिद्धी मिळाली नाही. सलील अंकोला (Salil Ankola) असे या खेळाडूचे नाव आहे. सलीलने क्रिकेटमध्ये सक्रीय असताना जितकं नाव कमावलं, त्यापेक्षा मोठं नाव त्याने क्रिकेट सोडल्यानंतर अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीद्वारे (Acting Career) कमावलं. (Pic Credit Salil Ankola Insta)

1 / 11
सलीलने सचिनसोबत पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ही त्याची पहिली आणि शेवटची कसोटी ठरली. त्यानंतर तो भारताकडून कसोटी खेळला नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात सलीलने 19 षटकात 93 धावांत एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात त्याने 11 षटकात 35 धावा देत एक बळी घेतला. (Pic Credit Salil Ankola Insta)

2 / 11
पाकिस्तानच्या या दौऱ्यावर सलीलने 18 डिसेंबर 1989 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पावसामुळे हा सामना 16-16 षटकांचा झाला आणि सलीलने चार षटकांत 26 धावा देत दोन गडी बाद केले.

3 / 11
पुढील काही सामन्यांमधील खराब कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले, पण 1993 मध्ये त्याने पुनरागमन केलं. यावेळीदेखील तो छाप पाडू शकला नाही. यावेळी त्याच्या खराब क्षेत्ररक्षणावर बरीच टीका झाली. (Pic Credit Salil Ankola Insta)

4 / 11
सलीलने हार न मानता पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले. यावेळी त्याची 1996 च्या विश्वचषकासाठी संघात निवड झाली. या विश्वचषकात तो एकच सामना खेळला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली. अपयशी ठरल्याने त्याला पुन्हा संघातून वगळलं.  (File Photo)

5 / 11
सलीलने शेवटचा एकदिवसीय सामना 13 फेब्रुवारी 1997 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्याने भारतासाठी 20 एकदिवसीय सामने खेळले आणि त्यात 13 बळी घेतले ज्यात 33 धावा देऊन 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वेळी, सलीलने 54 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 181 बळी घेतले. लिस्ट-ए मध्ये त्याने 75 सामन्यांमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत. (Pic Credit Salil Ankola Insta)

6 / 11
नंतर एका आजाराने त्याची कारकीर्द संपवली. बोन ट्यूमरने त्याचं क्रिकेट करिअर संपवलं. देशांतर्गत सामन्यात गोलंदाजी करताना त्याला त्रास झाला आणि तो पडला, पण नंतर कळले की त्याला बोन ट्यूमर आहे, ज्यामुळे त्याला पुन्हा क्रिकेट खेळता आलं नाही. (Pic Credit Salil Ankola Insta)

7 / 11
31 डिसेंबर 2020 रोजी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सलीलने सांगितलं की, त्याच्यावर झालेली शत्रक्रिया फसली होती. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वात योग्य टप्प्यात होतो. पण ते एक धोकादायक ऑपरेशन होते जे नीट झाले नाही. मी लोकांचे ऐकायला हवे होते आणि शस्त्रक्रियेसाठी परदेशात जायला हवे होते. माझ्यामध्ये सहा-सात वर्षांचं क्रिकेट बाकी होतं. पण शस्त्रक्रिया नीट न झाल्याने माझं मोठं नुकसान झालं. (File Photo)

8 / 11
यानंतर सलीलने अभिनय विश्वात पाऊल ठेवले आणि छोट्या पडद्यावर प्रवेश केला. झी टीव्हीवर 'चाहत और नफरत' ही त्याची पहिली मालिका होती. याशिवाय 'वो सच है', 'जाल', 'सीआयडी', 'श्श्श्श... कोई है', 'करम अपना अपना', 'विक्राल और गब्राल' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले. (File Photo)

9 / 11
त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. पण तिथे त्याला फारसे यश मिळाले नाही. त्याने संजय दत्तच्या 'कुरुक्षेत्र', 'चुरा लिया तुमने', 'पिता', 'तेरा इंतजार' या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. (File Photo)

10 / 11
सलील गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटमध्ये परतला. त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचा प्रमुख बनवण्यात आले आहे. (Pic Credit Salil Ankola Insta)

11 / 11
Follow us
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.