वेस्टइंडिज विरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने सहज जिंकला. वेस्ट इंडिजने विजयासाठी अवघ्या 114 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी राखून पूर्ण केलं.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं.भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आले तेव्हा टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनची जर्सी घातली होती.
सूर्यकुमार यादवच्या जर्सीवर सॅमसन लिहिलेले होते आणि 9 क्रमांकही होता.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते आणि सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला होता.
सूर्यकुमार यादव याने 25 चेंडूत 19 धावा केल्या. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मोटीच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.
सूर्यकुमार जर्सी घालून मैदानात आला तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.