AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Head Coach | राहुल द्रविड याचा लवकरच पत्ता कट! कोचपदासाठी चौघांची नावं आघाडीवर

Indian Cricket Team Head Coach | बीसीसीआय लवकरच एक्शन मोडमध्ये येऊन टीममधून राहुल द्रविड यांना क्लिन बोल्ड करु शकते. त्यामुळे टीम इंडियाला लवकरच नवा हेड कोच मिळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 07, 2023 | 9:45 PM
Share
टीम इंडियाला यंदा वर्ल्ड कप जिंकण्यात अपयश आल्यास अनेक बदल होऊ शकतात. कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह हेड कोच राहुल द्रविड याचाही टीममधून पत्ता कट होऊ शकतो. राहुल द्रविड याचा बीसीसीआयसोबतचा करार नोव्हेंबर 2023 मध्ये संपतोय. त्यामुळे द्रविडला कोच म्हणून मुदतवाढ न मिळाल्यास बीसीसीआय कोचपदासाठी अर्ज मागवू शकते. द्रविडच्या जागेसाठी एकूण चौघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहेत.

1 / 5
न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग कोच म्हणून प्रबळ दावेदार आहे. फ्लेमिंगला कॅप्टन आणि कोच म्हणून दीर्घ अनुभव आहे. फ्लेमिंग आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम चेन्नईचा हेड कोच आहे.

2 / 5
आशिष नेहरा हा कोच पदासाठी दावेदार आहे. टीम इंडियातून निवृत्त झाल्यानंतर नेहराने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स टीमच्या बॉलिंग कोचची जबाबदारी सांभाळली. नेहराने आपल्या मार्गदर्शनात 2022 मध्ये गुजरातला पहिल्याच वर्षात आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.

3 / 5
टीम इंडियाचा माजी स्टार ओपनर वीरेंद्र सेहवाग हा देखील कोचपदाच्या शर्यतीत आहे. सेहवागने आपल्या आक्रमक बॅटिंगने काळ गाजवलाय. सेहवागने याआधी कोचपदासाठी अर्ज केला होता. त्यामुळे यंदा सेहवागने अर्ज केल्यास त्याला नशीब साथ देतं का  याकडे लक्ष असेल.

4 / 5
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज टॉम मूडी याने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमची कोच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मूडीच्या कोचिंगमध्ये हैदराबादने 2016 साली ट्रॉफी जिंकली होती. टॉम मूडीने 2017 साली कोचपदासाठी अर्ज केला होता. तेव्हा मूडीने रवी शास्त्री यांना टक्कर दिली होती. मात्र विराट कोहली याच्यामुळे शास्त्री यांना संधी देण्यात आली होती.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.