बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीला धक्का, झालं असं की…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी खूपच महत्त्वाची आहे. भारताला काहीही करून पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. असं असताना विराट कोहलीला एक धक्का बसला आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धची खराब कामगिरीचा फटका बसला आहे.

| Updated on: Nov 06, 2024 | 5:05 PM
विराट कोहलीची क्रिकेट विश्वात रनमशिन्स म्हणून ख्याती आहे. पण मागच्या काही महिन्यात त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागलं आहे. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरला. त्याचा फटका त्याला आयसीसी क्रमवारीत बसला आहे.

1 / 6
आयसीसीने कसोटी क्रिकेटची नवी क्रमावारी जाहीर केली आहे. या यादीत विराट कोहली टॉप 10 सोडा तर टॉप 20 मधूनही फेकला गेला आहे. जवळपास 10 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विराट कोहलीला असा दिवस पाहायला मिळाला आहे.

2 / 6
आयसीसीने जाहीर केल्या नव्या क्रमवारीत विराट कोहलीची घसरण 22 व्या स्थानावर झाली आहे. दहा वर्षापूर्वी विराट कोहली पहिल्यांदाच टॉप 20 मधून आऊट झाला होता. तेव्हा इंग्लंड दौऱ्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होती.

3 / 6
विराट कोहलीने यावर्षी सहा कसोटी सामन्यात 22.72 च्या सरासरीने 250 धावा केल्या आहेत. त्यात फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. मागच्या वर्षात 8 कसोटीत त्याने 671 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने यावर्षी सहा कसोटी सामन्यात 22.72 च्या सरासरीने 250 धावा केल्या आहेत. त्यात फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. मागच्या वर्षात 8 कसोटीत त्याने 671 धावा केल्या होत्या.

4 / 6
विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दितील हा दुसरा बॅड पॅच आहे. यापूर्वी 2020 ते 2022 दरम्यान विराट कोहलीचा फॉर्म गेला होता. 2020 मध्ये 19.33, 2021 मध्ये 28.21 आणि 2022 मध्ये 26.50 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. पाच वर्षात विराटची फलंदाजीची सरासरी 30 च्या खाली गेली आहे.

5 / 6
यशस्वी जयस्वाल आयसीसी कसोटी क्रमावारी टॉप पाच फलंदाजांमध्ये आहे. यशस्वी जयस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत सहाव्या, शुबमन गिल 16 व्या आणि विराट कोहली 22 व्या स्थानावर आहे. तर कर्णधार रोहित शर्माची 26 व्या स्थानावर घसरण झाली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....