पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याने वर्ल्ड कप दरम्यान इतिहास रचलाय. शाहिनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शाहिन आयसीसी बॉलिंग वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 ठरलाय. शाहीनने थेट 7 स्थानांची झेप घेत ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याला पछाडलंय.
शाहिनने बांगलादेश विरुद्ध 23 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तसेच शाहिनने विकेट्सचं शतकही पूर्ण केलं. शाहिनने 51 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेणारा एकूण तिसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
शाहिन मार्को जान्सेन आणि एडम झॅम्पा तिघेही 16 विकेट्ससह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत. तर टीम इंडिया मोहम्मद सिराज तिसऱ्या आणि कुलदीप यादव सातव्या क्रमांकावर आहेत.
आयसीसी वनडे बॅट्समन रँकिंगमध्ये पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम अव्वलस्थानी आहे. तर शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलराउंडर्स यादीत बांगलादेश कॅप्टन शाकिब अल हसन नंबर 1 आहे.
शाहिनने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत . मात्र त्याला अजून अपेक्षित छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानवर वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचं संकट आहे.