PHOTO: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि 10 वर्ष बक्कळ पैसे कमवा
Farming Business | तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीच्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही.
Follow us
तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीच्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची मागणीही वाढली आहे. अशा नगदी पिकांच्या शेतीमधून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.
शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यासाठी फारसा खर्चही येत नाही. अवघ्या एका एकरात शेवग्याची लागवड करून तुम्ही लाखोंचे उत्पन्न मिळवू शकता.
अलीकडच्या काळात शेवग्याच्या शेंगाची शेती फायद्याचा व्यवसाय ठरत आहे. शेवग्याच्या शेंगा या आपल्याकडील जेवणात सर्रास वापरल्या जातात. मात्र, शेवग्याच्या झाडाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण असतात.
शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यासाठी फारसा खर्चही येत नाही. अवघ्या एका एकरात शेवग्याची लागवड करून तुम्ही लाखोंचे उत्पन्न मिळवू शकता.
शेवग्याच्या झाडात असणाऱ्या औषधी गुणांमुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे निर्यातीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जगभरातून औषधी वनस्पती म्हणून शेवग्याची मागणी वाढली आहे. इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणवल्या जाणाऱ्या शेवग्याचे वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलीफेरा असे आहे.
या झाडांना फार पाण्याची गरज नसते. त्यामुळे जोडपीक म्हणूनही शेवग्याच्या झाडांची लागवड करता येऊ शकते. उष्ण हवामान असलेल्या परिसरातच शेवग्याचे झाड चांगले वाढते. थंड प्रदेशात हा व्यवसाय तितकासा फायदेशीर ठरणार नाही.