झी मराठीवरील लोकप्रिय मालिके ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या स्वीटूनं आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे. स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव अन्विता फलटणकर आहे.
अन्विता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते आणि या व्हिडीओ आणि फोटोला चाहत्यांची देखील पसंती मिळते. अन्विताच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर नजर टाकली तर लक्षात येतं खऱ्या आयुष्यात स्वीटू खूपच स्टायलिश आहे.
आता अन्वितानं झी पुरस्कारासोबत खास फोटोशूट केलं आहे. घराच्या बाल्कनीत तिनं हे फोटो क्लिक केले आहेत.
अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केलं.
स्क्रिन वर साधी सरळ भूमिका करत असणारा कलाकार ऑफ स्क्रिन स्टायलिश राहतो. स्विटू स्क्रिन वर जरी निरागस असली तरी पडद्यामागे खूप वेगळी आहे.