भिडे मास्तर सोडणार ‘तारक मेहता..’? निर्मात्यांची केली पोलखोल? अभिनेत्याने सांगितलं सत्य

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असून गेल्या काही वर्षांत यातील अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. दयाबेन, तारक मेहता, टप्पू, गोली, सोनी यांसारख्या भूमिकांची जागा नव्या कलाकारांनी घेतली. आता आणखी एक कलाकार ही मालिका सोडून जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

| Updated on: Aug 28, 2024 | 12:11 PM
'तारक मेहता..'मध्ये आत्माराम भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांडवडकर ही मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जातंय. युट्यूबवर मंदार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये हात जोडलेला त्यांचा फोटो असून त्यावर लिहिलंय की, 'ते निर्मात्यांची पोलखोल करत आहेत आणि त्यांनी शो सोडला आहे.'

1 / 5
हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अखेर मंदार यांनीच त्यावर मौन सोडलं आहे. मंदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अखेर मंदार यांनीच त्यावर मौन सोडलं आहे. मंदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

2 / 5
या व्हिडीओमध्ये मंदार यांनी स्पष्ट केलंय की युट्यूबर व्हायरल होणारे फोटो हे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घेतले गेले आहेत. त्याचप्रमाणे त्यावर लिहिलेला सर्व मजकूर खोटा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

या व्हिडीओमध्ये मंदार यांनी स्पष्ट केलंय की युट्यूबर व्हायरल होणारे फोटो हे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घेतले गेले आहेत. त्याचप्रमाणे त्यावर लिहिलेला सर्व मजकूर खोटा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

3 / 5
"मी तारक मेहता.. या मालिकेला 16 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह केला होता. त्यातूनच त्यांनी फोटो उचलले आहेत आणि माझा खोटा व्हिडीओ बनवला आहे. हाच व्हिडीओ त्यांनी युट्यूबवर पोस्ट केला आहे. मला माझ्या पत्नीकडून या व्हायरल व्हिडीओविषयी समजलं. पण हा व्हिडीओ फेक आहे", असं मंदार यांनी स्पष्ट केलंय.

4 / 5
"मी तारक मेहता.. ही मालिका सोडणारही नाही आणि त्याबद्दल मला कोणतीच पोलखोलही करायची नाही", असंही त्यांनी म्हटलंय. याआधी अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरदसुद्धा मालिका सोडल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.