World Cup 2023 : भारताच्या 1983 पासून सेमी फायनल सामन्यांचा निकाल, पाहा कोणता संघ आपल्यावर ‘भारी’
IND vs NZ Semi Final : भारताचा बुधवारी न्यूझीलंडमध्ये पहिला सेमी फायनल सामना होणार आहे. याआधी किवींनी भारताला इंगा दाखवला आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी कधी आणि कोणी पराभूत केलं जाणून घ्या.
Follow us
भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला त्याचवेळी भारताने सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. 1983 मध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या सेमी फायनल सामन्यात इंग्लंडला भारताने 6 विकटने पराभूत केलं होतं.
भारतीय संघाचा 1987 साली मुंबईमध्ये इंग्लंडकडून 35 धावांनी पराभव झाला होता.
1987 नंतर भारताने 1996 मध्येच सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. त्यावेळी श्रीलंका संघाने कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात भारताचा पराभव केला होता.
भारतीय संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली 2003 साली फायनलमध्ये धडक घेतली होती. त्यावेळी केनियाच्या संघाचा सेमी फायनलमध्ये पराभव केलेला.
भारताला 2007 मध्ये सेमी फायनल गाठता आली नाही. त्यानंतर 2011 साली भारताने 29 धावांनी पाकिस्तान संघाल पराभूत केलं होतं.
भारताला 2015 साली सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत बाहेर काढलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून 95 धावांनी पराभव झाला होता.
न्यूझीलंड संघाने मँचेस्टर, 2019 मध्ये 18 धावांनी भारताला पराभवाचा धक्का दिला होता. आता हिशोब पुरा करायची वेळ भारताकडे आहे.