या मंदिरांमध्ये पाळला जातो ड्रेस कोड; योग्य पोशाख नसेल तर…

भारतात असंख्य मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची स्वतःची श्रद्धा आहे. यामुळेच देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला अनेक श्रद्धा - अंधश्रद्धा पाहायला मिळतात. भारताता अशीही काही मंदिरे आहेत, जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे.

| Updated on: Nov 18, 2021 | 3:17 PM
भारतात असंख्य मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची स्वतःची श्रद्धा आहे. यामुळेच देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला अनेक श्रद्धा - अंधश्रद्धा पाहायला मिळतात. भारताता अशीही काही मंदिरे आहेत, जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे, किंवा स्त्रिया अजूनही प्रवेश करत नाहीत. जाणून घेऊया अशाच काही मंदिरांबद्दल...

1 / 7
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथे असलेले बाबा बालकनाथ मंदिर शतकानुशतके जुने असल्याचे सांगितले जाते. पूर्वी महिलांच्या प्रवेशावर बंदी होती मात्र आता ती नाही, असे सांगितले जाते. मात्र तरीही श्रद्धेमुळे येथील महिला बाबांच्या गुहेबाहेरील व्यासपीठावरूनच दर्शन घेतात.

2 / 7
मध्य प्रदेशातील गुना येथील जैन मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा नियम आहे. येथे पाश्चात्य कपडे परिधान करून कोणतीही महिला किंवा मुलगी प्रवेश करू शकत नाही. या मंदिराचे मूळ नाव श्री शांतिनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे, जे १२३६ मध्ये बांधले गेले.

3 / 7
उत्तर पूर्व भारतातील आसाम राज्याची राजधानी गुवाहाटीच्या पश्चिम भागात नीलाचल टेकडीच्या मध्यभागी स्थित माँ कामाख्याचे मंदिरामध्ये सुद्धा असाच नियम आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरात मातेच्या पूजेसाठी कोणतीही मूर्ती स्थापित केलेली नाही, परंतु मंदिराच्या आवारात एक शिळा आहे ज्याची पूजा केली जाते. त्या शिळेला काळभैरव असे म्हणतात.  येथे मासिक पाळीच्या काळात कोणतीही महिला मंदिरात जात नाही.

4 / 7
 केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या ठिकाणी भगवान विष्णूची पहिली मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की महिला येथे विष्णूची पूजा करू शकतात परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. महिलांसोबतच येथील पुरुषांनाही भारतीय ड्रेसमध्ये मंदिरात जावे लागते.

5 / 7
सबरीमाला हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर हिंदू ब्रह्मचारी देवता अय्यपन यांना समर्पित आहे. सबरीमाला मंदिरात जाण्यासाठी भाविकांना ४१ दिवस उपवास करावा लागतो, असे सांगितले जाते. परंतु महिलांना यादरम्यान मासिक पाळी येते, त्यामुळे ते व्रत पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

6 / 7
 महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शनि शिंगणापूर मंदिर आहे. हे मंदिर भगवान शनीसाठी प्रसिद्ध आहे, जे अजूनही काळ्या दगडात येथे वास्तव्य करतात असे मानले जाते. 400 वर्षांहून अधिक काळ महिलांना शनी मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, असे म्हटले जाते, मात्र तीव्र विरोध महिलांना या मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र श्रद्धेची जाणीव ठेवून काही महिला आजही येथे जात नसल्याचे सांगितले जाते.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.