बप्पी लाहिरी अनेक दिवसांपासून त्यांच्या आजारावरती उपचार घेत होते. त्यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची पत्नी चित्रानी लाहिरी, मुलगी रीमा लाहिरी, मुलगा बप्पा लाहिरी असं त्यांचं कुटुंब आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मुलगा बप्पा लाहिरी एंजेलिसमधून भारताकडे निघाला आहे.