जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.
जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.
जर तुम्ही भूतकाळात अडकून राहिलात तर तुम्ही कधीही भविष्य घडवू शकणार नाही. जुन्या गोष्टी आणि चिंता सोडून आपला वर्तमान काळ चांगला करण्यासाठी प्रयत्न करा.
तुम्ही दुर्बल असलात तरी तुमची कमकुवतता इतर कोणाला दाखवू नका. तुम्ही त्या सापासारखे व्हा की जो विषारी नसतो तरीही लोक त्याला घाबरतात.
प्रेम हे सर्व दुःखाचे मूळ आहे. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता त्याचीच तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते. म्हणून, प्रेमाच्या बंधनातून मुक्त व्हा, आपले कर्तव्य पार पाडा आणि आनंदी जीवन जगा.