टाइप 2 मधुमेह होण्याची अनेक कारणे असू शकतात. मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी. साखरयुक्त आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने आरोग्याच्या समस्या वाढतात. त्यांच्यापासून दूर राहणे हेच आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरते.
सोडा आणि इतर शीतपेये पिण्याने देखील टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे डॉक्टरही शीतपेय न पिण्याचा सल्ला देतात.
मांसामध्ये कार्बोहायड्रेट नसते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कसा वाढतो हा प्रश्न तुम्हाला पडेल. पण 63 हजारांहून अधिक चिनी लोकांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की लाल मांस खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना याचा जास्त धोका असल्याचे आढळून आले.
21 देशांतील 1 लाख 32 हजारांहून अधिक लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की पांढरा भात जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो.
फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि पोषक घटक आढळतात. मात्र जॅम, जेली, गोड स्नॅक्स यांच्यामध्ये असणाऱ्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते न खाणंच आरोग्यासाठी उत्तम ठरतं.