साऊथच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटातून मिळाली ‘मुंज्या’ची प्रेरणा; दिग्दर्शकांचा खुलासा

मुंज्या हा चित्रपट पाहताना 'स्त्री' आणि 'भेडिया' या दोन चित्रपटांचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. मुंज्यामध्ये सीजीआयचा वापर करून बनवलेली भुताची आकृती प्रत्यक्ष खेळ घडवताना दिसते. त्यामुळे या चित्रपटाचा प्रभाव प्रेक्षकांवर पडला आहे.

| Updated on: Jun 16, 2024 | 8:10 PM
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, तरीही प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याच्या कथेला आणि विषयाला पसंती मिळतेय. 'मुंज्या'ची कल्पना कुठून मिळाली, याविषयी आदित्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

1 / 5
'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य सरपोतदार म्हणाला, "आपल्याकडे चित्रपटांसाठी विषयांची कमतरता नाही. मुंज्या ही ब्रह्मराक्षसाची कथा आहे. या कथा कोकणात, महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. अशा कथांवर चित्रपट का बनत नाहीत, असा प्रश्न मला लहानपणापासूनच पडायचा."

2 / 5
"अशाच एका लोककथेवर आधारित 'कांतारा' हा चित्रपट खूप गाजला. तिथूनच मला मुंज्यासाठी प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात, देशात, अनेक प्रांतात अशा कित्येक कथा आहेत, त्यावर चित्रपट बनवले जाऊ शकतात", असं आदित्यने सांगितलं.

3 / 5
या चित्रपटाविषयी त्याने पुढे सांगितलं, "हा हॉररपेक्षा कॉमेडी चित्रपट आहे. 10 ते 20 वर्षांच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून मी हा चित्रपट बनवला आहे. आम्ही खऱ्या लोकेशन्सवर जाऊन या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे."

4 / 5
कोकणात झालेलं शूटिंग, मराठी घरात घडणारी गोष्ट असल्याने एकापेक्षा एक चांगले मराठी कलाकार आणि उत्तम व्हीएफएक्सच्या माध्यमातून मुंज्यासह रंगवणाऱ्याचा केलेला प्रयत्न या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

कोकणात झालेलं शूटिंग, मराठी घरात घडणारी गोष्ट असल्याने एकापेक्षा एक चांगले मराठी कलाकार आणि उत्तम व्हीएफएक्सच्या माध्यमातून मुंज्यासह रंगवणाऱ्याचा केलेला प्रयत्न या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.