Neeraj Chopra : हरियाणाकडून 6 कोटी, क्लास वन अधिकारीपदी नियुक्ती, गोल्ड मेडल मिल्खा सिंग यांना समर्पित
नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
![भारताचा भालाफेक स्पर्धेतला स्टार खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो आॉलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002705/neeraj-4-compressed.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 9
![ऑलिम्पिक स्पर्धेत अथलॅटिक्स खेळांमध्ये भारताला आजवर कधीही पदक मिळालेलं नव्हतं. नीरज चोप्राने आपल्या सुवर्णपदकाने या खेळातला भारताचा कित्येक वर्षांचा पदकाचा दुष्काळ दूर केला आहे. नीरजने आपलं सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना समर्पित केलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002658/neeraj-8-compressed.jpg)
2 / 9
![ऑलिम्पिक स्पर्धेत नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत नीरजने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला. त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. सहाव्या फेरीत नीरजनं 84 मीटर थ्रो फेकला आणि सुवर्णपदकाचा वेध घेतला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002655/neeraj-9-compressed.jpg)
3 / 9
![हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002701/neeraj-6-compressed.jpg)
4 / 9
![नीरज चोप्राला मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला पूर्णपणे सराव करता आला नाही. मात्र, तरीही त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध साधत नीरजने समस्त भारतीयांची मान उंचावली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002700/neeraj-7-compressed.jpg)
5 / 9
![2018 मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता इथं एशियन्स गेम्समध्ये नीरजने 88.06 मीटर दूर भालाफेक केला होता. या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002707/neeraj-3-compressed.jpg)
6 / 9
![एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर 2018 मध्ये नीरजच्या खांद्याला दुखापत झाली होती. या कारणाने तो अनेक दिवस खेळापासून दूर होता. यावर्षी मार्च महिन्यात पुनरागमन करताना नीरजने इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 88.07 मीटर भाला फेकत स्वतःचाच नॅशनल रेकॉर्ड तोडला होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002703/neeraj-5-compressed.jpg)
7 / 9
![2016 मध्ये नीरजने पोलंडमध्ये झालेल्या IAAF अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये 86.48 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदक पटकावलंय. अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक स्तरावरच्या अॅथलेटिक स्पर्धेत पदक पटकवणारा नीरज दुसरा भारतीय आहे. या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002711/neeraj-1-compressed.jpg)
8 / 9
![नीरज चोप्राचा जन्म 27 डिसेंबर 1997 ला हरयाणाच्या पानीपत जिल्ह्यातल्या खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. नीरजने आपलं शिक्षण चंडीगढमधून पूर्ण केलं. अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून शिक्षण आणि खेळाची सांगड घालत नीरज मोठा झाला. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. तरी जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला आणि आज त्यानं खेळांच्या सर्वोच्च स्पर्धेतल्या सर्वोच्च पदकावर आपलं नाव कोरलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/08002709/neeraj-2-compressed.jpg)
9 / 9
![सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Sara_Tendulkar-9.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी
![या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ? या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/cropped-carrot-juice.jpg?w=670&ar=16:9)
या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?
![शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/symptoms-of-bad-shani.jpg?w=670&ar=16:9)
शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-king-corba.jpg?w=670&ar=16:9)
भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो
![विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/vinod-kambali-2-1.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये