दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आली आहेत. ठराविक रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Noida: Vehicles stuck in a traffic jam during farmers' 'Delhi Chalo' protest march against the Centre's new farm laws, at DND Flyway in Noida, Wednesday, Dec. 2, 2020. (PTI Photo)(PTI02-12-2020_000149A)
Follow us
गेल्या 7 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या अनेक रस्त्यांवर ठिय्या मांडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र रोज पाहायला मिळत आहे.
गेल्या 7 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या अनेक रस्त्यांवर ठिय्या मांडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र रोज पाहायला मिळत आहे.
दिल्लीच्या सर्व सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असल्यानं उत्तरप्रदेश, हरियाणावरुन दिल्लीला येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ट्राफिक पोलिसांकडूनही सातत्यानं दिशानिर्देश दिले आज आहेत.
चिल्ला बॉर्डरवर दिल्लीवरुन नोएडाला येणारा रस्ता सुरु करण्यात आला आहे. पण नोएडा ते दिल्ली हा रस्ता आजही बंदच आहे.
तर NH9 महामार्गावरील दोन्ही बाजूचा रस्ता आज बंद ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिसांकडून गाझीपूर बॉर्डर सील करण्यात आलीय. तर NH24 हा महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला आहे.
शेतकरी आंदोलन आणि दिल्ली पोलिसांनी अनेक रस्ते बंद ठेवल्यानं काही रस्त्यांवर नजर जाईल तिथपर्यंत वाहनांच्या रांगा दिसत आहेत. प्रवाशांना अनेक तास रस्त्यावरच घालवावे लागत आहेत.
टिकरी बॉर्डर, झरोडा बॉर्डर आज पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर बदूसराय बॉर्डर फक्त लहान वाहनांसाठी सुरु करण्यात आली आहे. तर झटीकरा बॉर्डर फक्त दुचाकी वाहनांसाठी सुरु असेल.