भाजीपाल्याचे उत्पादन घसरल्याचं पाहायला मिळत आहे. खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली नाही. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
मागच्या पंधरा दिवसापुर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये किलो विकले जात आहेत. मिरचीचे दर दुपटीने वाढून १०० रुपयांपर्यंत गेले आहेत.
कोथिंबीर २४० तर उन्हाळ्यात २०० रुपये किलोवर पोहोचलेले लिंबाचे दर आता फक्त २० रुपये आहे. गेल्या आठवड्यात ते ८० रुपये किलो होते.
बाजारात आवक वाढल्याने लिंबाचे दर पडले आहेत. मात्र, इतर भाजीपाला आवक वाढताच दर कमी होतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात महाग मिळत असल्याने विक्रेते मोजकी खरेदी करतात.
टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर १०० ते ११० रुपये किलोदरम्यान पोहोचले आहेत.