Photo | कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!

Wardha Car Accident : सर्व सातही मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अपघाताची बातमी ऐकून सगळ्यांनाच हादरा बसला आहे. सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामध्ये महाराष्ट्रातील एका भाजप आमदाराच्या मुलाचाही मृतांमध्ये समावेश आहे.

| Updated on: Jan 25, 2022 | 8:35 AM
पहाटे घडलेल्या भीषण अपघातात वर्ध्यातील सावंगी येथील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर काळानं घाला घातला. या अपघातात सातही जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारमधील कुणाचाही जीव वाचू शकला नाही.

1 / 9
देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे.  वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला.

2 / 9
भीषण अपघातातील सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

3 / 9
राज्यातील भीषण अपघातांची मालिका सुरु असून रविवारी रात्रीपासून राज्यानं भीषण अपघात पाहिलेत. पुणे-नगर महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. अवघ्या चोविस तासांस महाराष्ट्रात रस्ते अपघात आठ बळी गेले होते. अशातच सोमवारी रात्री आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे. वर्ध्यातील कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आता गेल्या 48 तासांत तब्बल 15 जणांचा मृ्त्यू झाला आहे.

4 / 9
सर्व सातही मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अपघाताची बातमी ऐकून सगळ्यांनाच हादरा बसला आहे. सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामध्ये महाराष्ट्रातील एका भाजप आमदाराच्या मुलाचाही मृतांमध्ये समावेश आहे. आविष्कार रहांगडाले असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आहे. आविष्कार मेडिकलच्या पहिल्याच वर्षाला होता. कॉलेजच्या मित्रांसोबत बर्थडे पार्टीला गेलेल्या आविष्कारवरही काळानं घाला घातला आहे.

5 / 9
नदीच्या पुलावर असलेला सुरक्षा कठडा तोडून कार थेट खाली कोसळली. तब्बल चाळीस फूट खोल कार थेट कोसळून कारचा चक्काचूर झाला. यात कारमधील विद्यार्थ्यांना जबर मार बसला.

6 / 9
हॉस्टेलला दहा वाजेपर्यंत येणं अपेक्षित होते. पण विद्यार्थी आले नव्हते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आलं होतं. तेव्हा कुटुंबीयांनाही विद्यार्थ्यांनी आपण वाढदिवस साजरा करायला जात असल्याची माहिती दिली होती. पण वाटेतच मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला.

7 / 9
सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते.  तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे. नीरजचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय.

8 / 9
या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.