अनेक वेळा लोक फूड कॉम्बिनेश ट्राय करण्याच्या नादात स्वत:च नुकसान करून ठेवतात. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे वजन वाढणं. जाणून घ्या कोणते फूड कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय करू नये.
जेवणानंतर गोड खाणं: हे असे कॉम्बिनेशन आहे, जे केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये लोक निश्चितपणे फॉलो करतात. काहींना खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची तल्लफ असते. ही सवय तुम्हाला लठ्ठपणाचा बळी बनवू शकते.
अधिक प्रोटीन: हेल्दी आणि निरोगी होण्यासाठी, लोक प्रथिनंयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरवात करतात. प्रथिनांचे सेवन आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करणं देखील शरीरासाठी हानिकारक असतं.
पोळी आणि तांदूळ: भारतातील अनेक भागांमध्ये ताटात भाजी आणि पोळी सोबत भात देखील दिसतो. तज्ज्ञांच्या मते, एकावेळी फक्त भात किंवा रोटी खावी, दोन्ही एकत्र खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.
चहा आणि नाश्ता: हे मिश्रण अनेकांच्या पसंतीचे आहे, परंतु हे केवळ वजन वाढवण्यासाठीच नाही तर हृदयासाठी देखील हानिकारक मानले जाते. चहासोबत स्नॅक्समुळे कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.