PHOTO : जगातील सर्वाधिक हिंस्र 8 हुकुमशाह, कुणी किती माणसांच्या हत्या केल्या?
जगातील सर्वाधिक हिंस्र 8 हुकुमशाह, कुणी किती माणसांच्या हत्या केल्या?
Follow us
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा नेता माओत्से तुंगने (Mao Zedong) तो सत्तेत आल्यावर 1946 ते 1976 या 30 वर्षांच्या काळात जवळपास 3 कोटी 19 लाख 98 हजार 894 लोकांचे बळी गेले. यामागे अमानवीय आर्थिक धोरणं, जबरदस्तीने मजुरी, हिंसक पद्धतीने सांस्कृतिक क्रांती करणे, भूमी सुधारणांसाठी एका वर्गाचं हत्याकांड करणे इशी कारणं होती.
जर्मनीचा प्रमुख (German leader) अॅडॉल्फ हिटलरने (Adolf Hitler) 1934 ते 1945 या 11 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात 1 कोटी 85 लाख 64 हजार 944 लोकांची हत्या केली. यात सर्वाधिक हत्या यहुदी समाजाच्या झाल्या. मृतांमध्ये जिप्सी (रोमा समुहाचे लोक), सर्बियाचे लोक, गुलाम, अपंग, समलैंगिक, युद्धकैद्यांचा समावेश आहे.
बेनिटो मुसोलिनीने (Benito Mussolini) युरोपीयन देश इटलीत (Italy) 1922 ते 1945 या 24 वर्षांच्या कार्यकाळात सरासरी 3 लाख 14 हजार 998 लोकांची हत्या केली.
सोवियत संघाच्या (Soviet Union) कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव जोसेफ स्टॅलिनच्या (Joseph Stalin) कार्यकाळात 1922 ते 1953 या 31 काळात 1 कोटी 14 लाख 16 हजार 182 लोकांची हत्या झालीय. अमेरिकन लेखक टिमोथी डी. स्नाइडरने 2011 मध्ये स्टॅलिनच्या काळात सरासरी 60 लाख ते 90 लाख लोकांची हत्या झाल्याचं म्हटलंय.
आफ्रिकेतील सुडानचे (Sudan) माजी राष्ट्रपती ओमर अल-बशीर (Omar al-Bashir) यांच्या 1989 ते 2019 या 29 वर्षांच्या कार्यकाळात सरासरी 16 लाख 39 हजार 936 लोकांचा मृत्यू झालाय.
यूगांडाचे (Uganda) माजी राष्ट्रपती ईदी अमीन (Idi Amin) यांच्या 1971 ते 1979 या 8 वर्षांच्या कार्यकाळात सरासरी 2 लाख 23 हजार 607 लोकांचा मृत्यू झालाय.
इराकचे (Iraq) राष्ट्रपती सद्दाम हुसैन (Saddam Hussein) यांच्या काळात 1979 ते 2003 या 24 वर्षांच्या काळात सरासरी 6 लाख 32 हजार 456 लोकांचा मृत्यू झालाय.
उत्तर कोरियाचे (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong-un) यांचे वडिल किम जोंग इल (Kim Jong-il) आणि बहिण किम इल संग (Kim Il-sung) यांच्या कार्यकाळात 15 लाख 76 हजार 388 लोकांचा मृत्यू झालाय.