आपल्या अंतराळातील सूर्यमालेत एकंदरीत 8 ग्रह आहे यांच्या व्यतिरिक्त काही लघुग्रह देखील आहेत. या प्रत्येक ग्रहाची संरचना ही वेगवेगळी आहे.अनेक ग्रहांमध्ये आपल्याला आकार,स्वरूप यात असमानता देखील पाहायला मिळते. जर मंगळ ग्रह बद्दल बोलायचे झाल्यास या ग्रहांची रचना आपल्या पृथ्वीशी मिळती जुळती आहे अशीच समानता सूर्यमालेतील , यूरेनस आणि नेप्च्यून या ग्रहांमध्ये आपल्याला दिसून येते. या दोन ग्रहाची संरचना, आकारमान व स्वरूप हे देखील एक सारखे आपल्याला दिसून येते तसेच या दोघांची गती शीलता आपल्याला एक सारखी पाहायला मिळते म्हणून अनेकदा या ग्रहांना सूर्यमालेतील जवळ असलेले ग्रह म्हणून संबोधले जात असते. तसे पाहायला गेले तर या दोन्ही ग्रहांमध्ये खूपच तफावत आहे तसेच अंतर सुद्धा पाहायला मिळते युरेनस ग्रह हलकासा निळा रंगांसोबतच थोडा हिरवा आहे. त्याचबरोबर नेपच्यून ग्रह रंगाने गडद रंगाचा आहे.