Women Led Series: ‘तिची’ कहाणी, दमदार अभिनय, या 5 वूमन सेंट्रिक वेब सीरीज पाहाच!
देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. सिनेमागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यात ओटीटीमुळे आपलं चांगलं मनोरंजन होत आहे.
देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. सिनेमागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यात ओटीटीमुळे आपलं चांगलं मनोरंजन होत आहे. या नकारात्मकते पासून लांब जात एखादी वेब सिरीज पाहणं अनेक जण पसंत करतात. त्यामुळे अशा पाच वेब सिरीज बद्दल सांगणार आहोत ज्याचं नेतृत्व महिलांनी केलं आहे.
Follow us
देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. सिनेमागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यात ओटीटीमुळे आपलं चांगलं मनोरंजन होत आहे. या नकारात्मकते पासून लांब जात एखादी वेब सिरीज पाहणं अनेक जण पसंत करतात. त्यामुळे अशा पाच वेब सिरीज बद्दल सांगणार आहोत ज्याचं नेतृत्व महिलांनी केलं आहे.
नुकतंच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘बॉम्बे बेगम’ मध्ये पाच महत्त्वकांशी महिलांची कथा आहे ज्यांचं आयुष्य एकमेकांसोबत जोडलेलं आहे. फर्टिलीटी पासून ते लैंगिक छळ या विषयांपर्यंत या सिरीजनं समाजातील या सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. या मालिकेबद्दल प्रेक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया दिसून आली.
श्रेया धन्वंतरी आणि सबा आझाद स्टारर सिरीज ‘लेडीज रूम’ पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. हास्य आणि विनोदांमध्ये ही मालिका एका सामाजिक विषयाकडे लक्ष वेधून घेते. प्रौढ असलेल्या दोन मुलींमध्ये हे दाखवण्यात आलं आहे की जेव्हा त्या बाहेर पडतात तेव्हा त्यांना वॉशरूममधील समस्यांचा सामना कसा करावा लागतो. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे 6 वेगवेगळ्या वॉशरूममध्ये या सिरीजचे शूटिंग करण्यात आले आहे. तुम्ही ही सिरीज यूट्यूबवर पाहू शकता.
शोभिता धूलीपाला स्टारर ‘मेड इन हेव्हन’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. ही सिरीज लोकांच्या सर्वाधिक पसंतीच्या विषयावर म्हणजे विवाहसोहळ्यांविषयी आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओची ही मालिका आहे. ही मालिका तुम्हाला हसवेल, कदाचित रडवेल, मात्र तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल.
‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ ही मालिका अशा चार महिलांची कहाणी आहे जी त्यांच्या आयुष्यात काही अडचणींना घेऊन संघर्ष करत आहेत, मात्र जेव्हा जेव्हा त्या एकत्र असतात तेव्हा त्या त्यांच्या मैत्रीचा खूप आनंद घेतात. मालिकेच्या कास्टची केमिस्ट्री, अनोख कथानक आणि नाटक तुम्हाला आकर्षित करणारं आहे. कदाचित ही सिरीज पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे मित्र-मैत्रिणी आठवतील. ही मालिका Amazon प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
‘लैला’ ही एका महिलेची कहाणी आहे. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि ती आपल्या मुलीचा शोध घेत आहे. या काळात ती अशा ठिकाणी पोहोचते जिथे महिलांवर अत्याचार केले जातात. ही मालिका देशाचं भविष्य दर्शविते जी हे पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. दीपा मेहता दिग्दर्शित या मालिकेत हुमा कुरेशीनं मुख्य भूमिका साकारली आहे. तुम्ही नेटिफ्लिक्सवर ही सिरीज पाहू शकता.