Ramdas Tadas : शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार, खासदार रामदास तडस यांचं शिर्डीत मोठं वक्तव्य
आमदार शिंदे गटात दाखल झाल्यापासून काही खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. शिवसेना आणि भाजपची युती असताना हे आमदार निवडून आले आहेत.
मुंबई – शिवसेनेचे (Shivsena) 12 खासदार एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी तसा दावा केला आहे. सेना खासदारांच्या नाराजी बाबत खासदार तडस यांनी शिर्डीत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. शिंदे गटात खरचं खासदार जाणार का याची देखील चर्चा आहे. शिवसेना खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. विकासासाठी जनतेने निवडून दिले मात्र विकास न झाल्याने नाराजी आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाठी सेनेचे 12 खासदार पाठिंबा देतील. शिर्डीत तैलिक महासभेच्या कार्यक्रमासाठी आले असता भाजप खासदार रामदास तडस यांनी असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेतील किती आमदार शिंदे गटात सामील होणार हे पाहावे लागेल.
भाजपच्या गोटात नाराजी
महाविकास आघाडीसोबत आमचं जमतं नाही असं कारण पुढे करतं. तसेच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केलं. तेव्हापासून शिवसेनेतील कार्यकर्त्यांची स्थिती दोलनामय झाली आहे. दहा दिवस राजकीय नाट्य चालल्यानंतर महाराष्ट्रात अखेर नवं सरकार स्थापण झालं. तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून बंडखोर नेत्यांवरती जोरदार टीका केली जात आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील त्यांचा अंतर्गत वाद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात बंड केलेल्या नेत्यांना कोणती पदं मिळणार अशीही चर्चा आहे. कारण सगळ्यांना मंत्रीपद देणं शक्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री न बसवल्याने त्यांच्या गटात देखील नाराजी आहे.
खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा
आमदार शिंदे गटात दाखल झाल्यापासून काही खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. शिवसेना आणि भाजपची युती असताना हे आमदार निवडून आले आहेत. अनेक खासदारांनी जाणार असल्याचे संकेत दिल्याची माहिती देखील मिळाली आहे. काल झालेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना खासदार रामदास तडस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
तडस यांनी थेट आकडा सांगितल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.