28 पैकी 16 पक्षांचा मल्लिकार्जुन खर्गेंना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा, इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

इंडिया आघाडीची आज दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास दोन ते तीन तास ही बैठक पार पडली. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

28 पैकी 16 पक्षांचा मल्लिकार्जुन खर्गेंना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा, इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
India Alliance
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 9:00 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : इंडिया आघाडीची आज अतिशय महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत तब्बल 28 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीची चेहरा कोण असेल? याबाबत चर्चा झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदासाठी काँग्रसेच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं फक्त नाव सूचवलं. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांच्या मताला सहमती दर्शवली. विशेष म्हणजे खर्गे पंतप्रधान बनले तर देशाचे पहिली दलित समाजाचे पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केजरीवाल यांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर 28 राजकीय पक्षांपैकी 16 राजकीय पक्षांनी खर्गेंच्या नावाला पाठिंबा दिला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा देखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय आम्ही जिंकल्यानंतर घेऊ”, अशी भूमिका मांडली. “आमचं पहिलं काम निवडणूक जिंकणं हे आहे. त्यानंतर आम्ही ठरवू. आम्ही आधी जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करु इच्छित आहोत. विजयानंतरच आम्ही पीएम पदाबाबत निर्णय घेऊ”, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

‘दिल्ली आणि पंजाबच्या जागावाटपाबाबत पुढच्या टप्प्यांमध्ये चर्चा’

“इंडिया आघाडीचं जागावाटप हे राज्य स्तरावर होईल. जर काही ठिकाणी या फॉर्म्युल्याने काम झालं नाही तर आम्ही सर्व मिळून याबाबत योग्य तो निर्णय घेऊ. दिल्ली आणि पंजाबच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरवायचा, याबाबत आम्ही नंतर विचार करु. दिल्ली, पंजाब सारख्या राज्यांच्या जागावाटपाचा मुद्दा थोडा किचकट आहे. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या जागावाटपाबाबत पुढच्या टप्प्यांमध्ये चर्चा केली जाईल”, अशी माहिती मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.

’30 जानेवारीपासून सभा’

या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला सर्व पक्षांसोबत एकत्र मिळून सर्व जागा वाटपाबाबत 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करावं, असं मत मांडलं आहे. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी 30 जानेवारी 2024 पासून संयुक्त सभा घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.