एक-दोन नव्हे, मोदींचे तब्बल 36 मंत्री जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कारण काय?

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करुन आता जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एकीकडे सरकार दावा करत आहे की जम्मू काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे.

एक-दोन नव्हे, मोदींचे तब्बल 36 मंत्री जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कारण काय?
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 11:56 AM

श्रीनगर : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करुन आता जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एकीकडे सरकार दावा करत आहे की जम्मू काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे. (Modi Ministers to visit jammu and kashmir ) तर दुसरीकडे सर्वकाही ठिक असेल तर आम्हाला तिकडे जाऊ का दिलं जात नाही, असा प्रश्न विरोधीपक्ष विचारत आहेत. राज्यात संपूर्णपणे इंटरनेटसेवा अजूनही सुरळीत नाही. अनेक नेते आजही नजरकैदेत आहेत. (Modi Ministers to visit jammu and kashmir )

सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपानंतर मोदी सरकारचे तब्बल 36 मंत्री 18 ते 25 जानेवारीदरम्यान जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.

ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तानुसार सर्व मंत्री जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात जाऊन, कलम 370 हटवल्यानंतरची परिस्थिती नागरिकांकडून जाणून घेणार आहेत. शिवाय सरकारमार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांची माहितीही देणार आहेत.

कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्यासह 5 मंत्री काश्मीर खोऱ्यात, तर अन्य सर्व मंत्री जम्मूमध्ये जाऊन प्रचार-प्रसार करणार आहेत.  मोदी सरकारचे हे सर्व मंत्री दोन्ही विभागातील विविध जिल्ह्यात 24 जानेवारीपर्यंत राहतील.

दरम्यान, विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरही टीका केली आहे. सरकार आधी कायदा संमत करुन घेते आणि मग नागरिकांकडून त्याला समर्थन मागते, हा मोदी सरकारचा डाव आहे, असं विरोधकांनी म्हटलं.

तर भाजपकडून हा विकास कामांसाठी जम्मू काश्मीर दौरा असल्याचं म्हणत, याबाबत राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.