शिवसेनेच्या ढाण्या वाघाची विधानसभेत एन्ट्री, वामनराव महाडिकांच्या विजयाला 51 वर्ष पूर्ण, शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस
शिवसेनेचे पहिले आमदार वानराव महाडिक यांच्या विजयाला आज बरोबर 51 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर 51 वर्षांपूर्वी, म्हणजे 20 ऑक्टोबर, 1970 या दिवशी, वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले.
मुंबई : शिवसेनेचे पहिले आमदार वानराव महाडिक यांच्या विजयाला आज बरोबर 51 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर 51 वर्षांपूर्वी, म्हणजे 20 ऑक्टोबर, 1970 या दिवशी, वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने चार वर्षात विधानसभेत प्रवेश वामनराव महाडिकांच्या रुपाने एन्ट्री केली. 20 ऑक्टोबर, 1970 ला महाडिकांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी दिवाळी साजरी केली होती.
कम्युनिस्ट नेते आमदार कृष्णा देसाई यांची 5 जून 1970 साली या दिवशी हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे महाष्ट्रात गजहब निर्माण झाला. त्यांच्या हत्येचा संशय शिवसेनेवर होता. देसाई यांच्या हत्येनंतर परळच्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई आणि शिवसेनेच्या वानराव महाडिक यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत वामनराव महाडिकांनी 1679 मतांनी विजय मिळवून शिवसेनेचा भगवा पहिल्यांदाच विधानसभेत नेला.
शिवसेना कम्युनिस्ट यांच्यात संघर्ष, कृष्णा देसाईंची हत्या, महाडिकांच्या रुपात शिवसेनेचं विधानसभेत पाऊल!
बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी अस्मितेसाठी, भूमीपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण असं सांगतच शिवसेनेने जन्म घेतला. 1967 साली शिवसेनेने ठाणे महापालिका निवडणूक लढवली आणि आश्चर्य म्हणजे सेनेने या निवडणुकीत सर्वाधिक जागाही जिंकल्या. 1968 साली मुंबई महापालिका निवडणूक झाली. या निवडणुकीतही सेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
पण याच दरम्यानच्या वर्षात शिवसेनेचा कम्युनिस्टांबरोबर संघर्ष सुरु झाला. लालबाग परळ गिरणगावात कम्युनिस्टांच्या लाल बावट्याचा जोर होता. कम्युनिस्टांना मानणारा वर्ग होता. हाच जोर शिवसेनेने कमी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान शिवसेना कम्युनिस्टांमधला संघर्ष पेटला. याच संघर्षातून कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाली. पुढे त्यांच्या हत्येची सुई शिवसेनेवर आली. कृष्णा देसाईंच्या निधनानंतर परळच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीचा सामना सेनेच्या वामनराव महाडिक यांच्याविरुद्ध झाला. बाळासाहेब ठाकरेंची तुफान लोकप्रियता, शिवसैनिकांनी केलेला प्रचार आणि मराठी माणसाला घातलेली साद यांच्या बळावर परळमध्ये शिवसेनेने भगवा फडकावला. पर्यायाने महाडिकांच्या रुपात सेनेने विधानसभेत पाऊल ठेवलं.
अटीतटीच्या लढाईत सेनेचा भगवा लाल बावट्यावर भारी!
वामनराव महाडिक यांनी सरोजिनी देसाई यांचा 1679 मतांनी पराभव केला. वामनराव महाडिकांना 31 हजार 592 मतं मिळाली तर सरोजिनी देसाईंना 29 हजार 913 मतं मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये अतिशय टोकाची लढाई झाली. पण अटीतटीच्या लढाईत सेनेचा भगवा लाल बावट्यावर भारी पडला. सायंकाळी ठीक सहा वाजता वामनराव महाडिकांच्या विजयाची घोषणा काऊन्सिल हॉलच्या मतमोजणी केंद्रावर झाली. मुंबईत शिवसैनिकांनी सर्वत्र फटाके वाजवून दिवाळी साजरी केली.
(51 years Complete victory of Shivsena Vamanrao Mahadik Paral bypoll Election After krishna Desai Murder)
हे ही वाचा :
…जेव्हा बाळासाहेबांनी मीनाताईंना तुरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचतात!