पुणे जिल्ह्यातील 84 गावांना पुराचा धोका सर्वाधिक, जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पावसाळ्याचं नियोजन सुरू
दौंड तालुक्यात सर्वाधिक भीमा नदीच्या काठावरील 16 गावांना पुराचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पावसाळ्याचं नियोजन सुरू केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील 84 गावांना पुराचा धोका सर्वाधिक असल्याने आत्तापासून जिल्हा प्रशासनाने पावसाळ्याचे नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापन आढावाची बैठक घेतली. त्यावेळी संबंधित विभागाला सुचना दिल्या आहेत. आपत्ती काळात लागणारं सामान उपलब्ध करण्याच्या विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. दौंड तालुक्यात सर्वाधिक भीमा नदीच्या काठावरील 16 गावांना पुराचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पावसाळ्याचं नियोजन सुरू केलं आहे.