Sanjay Raut ED summons : शिवसेनेचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रयत्न? शिवसेना नेते संजय राऊतांना ईडीची नोटीस, केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष वाढला

Sanjay Raut ED summons : केंद्र सरकारचा संजय राऊतांना झटका! राऊतांना ईडीची नोटीस, केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष वाढला

Sanjay Raut ED summons : शिवसेनेचा 'आवाज' दाबण्याचा प्रयत्न? शिवसेना नेते संजय राऊतांना ईडीची नोटीस, केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष वाढला
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 12:58 PM

मुंबई : राजकीय भूकंपात मोठी बातमी समोर येतेय. संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीनं (ED) समन्स पाठवलं आहे. जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठलं आहे. उद्या 28 जून रोजी त्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. राऊतांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरण (Patra Chawl land scam case) प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. आधीच शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. महाविकास आगाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. हे असताना संजय राऊतांना मोठा ईडीचा मोठा झटका बसल्याचं बोललं जातंय. दरम्यान, ईडीची नोटी अद्यापही मिळालेली नाही, असं शिवसेना नेते संजय राऊता यांनी स्पष्ट केलंय

संजय राऊतांना ईडीची नोटीस

पत्राचाळ घोटाळा काय?

2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प 2008 मध्ये सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला 1 हजार 34 कोटींना फसवले होते. बिल्डरने विक्रीचे क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप आहे. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

राऊत ते राऊत कनेक्शन

प्रवीण राऊतांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे 10 वर्षानंतर परत केले. हे पैसे कर्ज म्हणून घेतल्याचा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता. पण, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली होती. याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी वापरल्याचा ईडीला संशय आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.