पत्नी राष्ट्रवादीत, मोहसिन शिवसेनेत, राणे-सेना संघर्षात चोख कामगिरी, आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्नी राष्ट्रवादीत, मोहसिन शिवसेनेत, राणे-सेना संघर्षात चोख कामगिरी, आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस
मोहसीन शेख
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 12:38 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोहसीन शेख यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. आपण जाणून घेऊयात, कोण आहेत मोहसीन शेख? त्यांची याअगोदरची राजकीय पार्श्वभूमी काय? आणि त्यांना युवासेनेकडून इतकी मोठी लॉटरी लागण्यामागे नेमकं काय कारण आहे….

कोण आहेत मोहसीन शेख, राजकीय पार्श्वभूमी कोणती?

मोहसीन शेख शिवसेनेत येण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु काही कारणांनी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्ष अगोदर म्हणजेच  2017 ला राष्ट्रवादीला बायबाय करत शिवसेना भगवा झेंडा खांदयावर घेतला. शिवसेनेत आल्यापासून त्यांनी चांगलं काम केलं. गेल्या 4 वर्षात आपल्या कामाने त्यांनी पक्षनेतृत्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

युवासेनेच्या जनसंवाद यात्रेतही मोहसीन शेख सहभागी होता. तसंच युवासेनेच्या अनेक कार्यक्रमात मोहसीन शेख अग्रक्रमाने पुढे असतो. साहजिक त्याने आपल्या कामाची छाप सोडली आहे.

पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका

विशेष म्हणजे मोहसीन शेख यांची पत्नी आणखीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. मानकूर्द शिवाजीनगरच्या त्या नगरसेविका आहेत. पत्नी राष्ट्रवादीत आणि मोहसीन शेख शिवसेनेत आहेत.

राणेंच्या घराबाहेर राडा, आदित्य ठाकरेंकडून बक्षीस

मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारले होते. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झालीय. जी पाहून अनेकजण हळहळले होते. राणे-सेना आंदोलावेळी राणे समर्थकांशी पंगा घेतल्यानेच शेख याची युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.

(Aaditya Thackeray appointed Mohsin Shaikh as the joint secretary of Yuvasena)

हे ही वाचा :

राणेंच्या घराबाहेर जाऊन ताकद दाखवली, आधी उद्धव ठाकरेंकडून शाबासकी, आता आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस

शाब्बास पठ्ठ्यांनो! राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.