AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : संजयकाका उद्या बोलायचं काय? आदित्य ठाकरेंचा प्रश्न

Aaditya Thackeray : "7 ते 10 वर्षाचा असल्यापासून हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माझे वडिल उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीत, विमानात बसून दौऱ्यावर निघून जायचो. एकदा 10 वी परीक्षेच्या चार दिवस आधी वडिलांसोबत श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो" अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

Aaditya Thackeray : संजयकाका उद्या बोलायचं काय?  आदित्य ठाकरेंचा प्रश्न
aaditya thackeray
Follow us
| Updated on: Apr 16, 2025 | 12:18 PM

“मुंबईत रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, या सगळ्या गोष्टींवर बोलत असताना मला एक गोष्ट जाणवली की, प्रत्येक जिल्ह्यात, विभागात असं शिबीर होणं गरजेच आहे. आज आपल्याला वाटचाल कशी करणार आहोत, त्यासाठी दिशा, रोडमॅप ठरवायचा आहे. शहरावर, जिल्ह्यावर बोलण तसं सोपं असतं, कारण स्थानिक विषयांची माहिती असते” असं आदित्य ठाकरे म्हणाले. नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे गटाचं निर्धार शिबीर सुरु आहे.

“आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, तेव्हा मी राऊतसाहेबांना फोन केला. संजयकाका उद्या बोलायचं काय? मला विषय काय दिलाय? ते लगेच बोलले, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर बोलं. प्रश्न हाच आहे की, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या सरकारला 100 दिवस उलटून गेले आहेत” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “लहानपणापासून राजकारणाची आवड होती. 7 ते 10 वर्षाचा असल्यापासून हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माझे वडिल उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीत, विमानात बसून दौऱ्यावर निघून जायचो. एकदा 10 वी परीक्षेच्या चार दिवस आधी वडिलांसोबत श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो” अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचं कौतुक होतं

“कुठलही सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस हनीमून पीरियड असतो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचं कौतुक होतं. या महाझुठी सरकारचे पहिले 100 दिवस कसे होते? एकतरी चांगली योजना आणली का? निवडणूक आयोगाच्या आशिर्वादामुळे बसलेल्या या सरकारने शेतकऱ्यांसाठी 100 दिवसात एकतरी चांगली योजना आणली का?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.