Ajit Pawar : आरोप म्हणल्यावर चौकशी गरजेचीच, सत्तारांवरील आरोपावरुन अजित दादांची रोखठोक प्रतिक्रिया

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्यामुळे नाव आले म्हणल्यावर ते खरे आहे का नाही हे पडतळण्यासाठी चौकशी होणे गरजेचे आहे. त्याशिवाय सत्य समोर येणार नाही. हा बातमी समोर येताच अब्दुल सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमकं खरं काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे.

Ajit Pawar : आरोप म्हणल्यावर चौकशी गरजेचीच, सत्तारांवरील आरोपावरुन अजित दादांची रोखठोक प्रतिक्रिया
आ. अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 5:52 PM

मुंबई : उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घालत असताना शिंदे गटातील आमदार (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET Scam) टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोपांमध्ये अनेकांची नावे असून यामध्ये अब्दुल सत्तार यांचे देखील नाव समोर आले आहे. मात्र, या प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचे म्हणत हे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. पण आता विरोधक हे प्रकरण उचलून धरताना पाहवयास मिळत आहे. आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले तरी नाव आले म्हणल्यावर चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाहीतर कसून चौकशीनंतरच यामधील सर्वकाही बाहेर येईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहे.

नेमकं काय खरं..?

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्यामुळे नाव आले म्हणल्यावर ते खरे आहे का नाही हे पडतळण्यासाठी चौकशी होणे गरजेचे आहे. त्याशिवाय सत्य समोर येणार नाही. हा बातमी समोर येताच अब्दुल सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमकं खरं काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला आहे. नक्की सत्तार म्हणतात ते खरं की बातमी खरी? काही चुकीचं झालं असेल तर चौकशी झाली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अधिवेशनातही मुद्दा मांडणार

टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तार यांची चौकशी झाल्याशिवाय नेमका त्यांचा सहभाग आहे की नाही हे समजणार नाही. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून तर करण्यात आलीच आहे. पण यावर सरकार काय भूमिका घेतयं हे देखील महत्वाचे आहे. शिवाय सरकारने कोणती पावले उचलली नाहीत तर मात्र, अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका अब्दुल सत्तार यांचा संबंध कसा?

गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या परीक्षार्थींची नावे आहेत.

आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.