पंढरपूरची पोटनिवडणूक थांबवा, अभिजीत बिचुकले निवडणूक आयोगाकडे जाणार

राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले होते. (Abhijit Bichukale Pandharpur by poll)

पंढरपूरची पोटनिवडणूक थांबवा, अभिजीत बिचुकले निवडणूक आयोगाकडे जाणार
अभिजीत बिचुकले
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 2:48 PM

पंढरपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात विनंती करणार असल्याची माहिती बिचुकले यांनी दिली. अभिजित बिचुकले यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. (Abhijit Bichukale demands to stop Pandharpur Mangalvedha by poll)

पोटनिवडणूक न थांबवल्यास प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा बिचुकलेंनी दिला. बारा एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा पवित्रा अभिजीत बिचुकले यांनी घेतला आहे. सभेसाठी येणारे विविध भागातील नेत्यांमुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोना वाढत असल्याचा आरोप बिचुकलेंनी केला.

राष्ट्रपती ते नगरसेवक, सर्व निवडणुकांची उमेदवारी

अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली नाही.

विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले होते. (Abhijit Bichukale demands to stop Pandharpur Mangalvedha by poll)

पुणे मतदार यादीतच नाव नव्हते

काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली होती. मात्र, त्यावेळी मतदानाला गेलेल्या बिचुकले यांचे नावच मतदार यादीत सापडले नव्हते. त्यामुळे अभिजित बिचुकले यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यापूर्वी 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढा पंढरपूर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेंना तिकीट दिलं आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

भाजप आणि राष्ट्रवादीचं सोडा, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

 पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो : जयंत पाटील 

(Abhijit Bichukale demands to stop Pandharpur Mangalvedha by poll)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.