बाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी

अबू आझमी यांनी पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत असल्याची जहरी टीका केलीय (Abu Azmi criticize Modi Government and CBI after Babri Verdict).

बाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 4:42 PM

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार पार्टी आमदार अबू आझमी यांनी बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणावरील सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रकरणात पुरावे गोळा करणारी तपास संस्था सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत असल्याची जहरी टीका केली आहे (Abu Azmi criticize Modi Government and CBI after Babri Verdict). जोपर्यंत देशात मोदी सरकार आहे तोपर्यंत न्याय मिळेल असं वाटत नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच सर्व पक्षांनी एकत्र येऊन या सरकारला सत्तेपासून दूर करावं, असं आवाहन केलं.

अबू आझमी म्हणाले, “आजचा दिवस पुन्हा एकदा भारतासाठी काळा दिवस आहे. बाबरी मशीद 1528 मध्ये बनवण्यात आली होती. 1949 मध्ये जबरदस्तीने मशिदीत मूर्ती ठेवण्यात आली. 1992 मध्ये ही मशीद पाडण्यात आली. हे सर्व जगाने पाहिलं आहे. जेव्हापासून केंद्रात मोदी सरकार आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, आयटी, पोलीस या संस्थांना केवळ खेळणं बनवून टाकलं आहे. अयोध्या जमिनीच्या प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मशीद पाडण्यात आली आणि तेथे मुर्ती ठेवण्यात आली हे चुकीचं झाल्याचं म्हटलं.”

“इतकी मोठी मशीद तोडण्यात आली आणि आज त्याचा एकही पुरावा शिल्लक नाही. आता या देशात हेच होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून साध्वीला सोडण्यात आलं, पुरोहित यांनाही सोडण्यात आलं, मेजर उपाध्याय सुटले. माजी आयटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मेहनत करुन या प्रकरणात पुरावे गोळा केले. मात्र, उद्या हमंत करकरे अप्रमाणिक असल्याचा दावा केला जाईल. तसेच मोदी सरकारचं खेळणं झालेल्या एनआयएला खरं मानलं जाईल. जर या देशाचा हाच नियम असेल तर भविष्यात खूप अंधःकार आहे,” असंही अबू आझमी म्हणाले.

“जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत न्याय मिळेल असं वाटत नाही”

अबू आझमी म्हणाले, “जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत न्याय मिळेल असं वाटत नाही. मी सीबीआयचा निषेध करतो. सीबीआयला सरकारचं खेळणं बनण्यापासून रोखायचं असेल, देशात कायद्याचं राज्य आणायचं असेल तर सर्व विसरुन सर्व पक्षांनी एक झालं पाहिजे. मोदी आणि शाह यांच्या हातातील भाजपला सत्तेच्या गादीवरुन दूर ढकलावं लागेल. नाही तर हा देश उद्ध्वस्त होईल. जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याचं उल्लंघन करत आहेत त्यांना हटवलं पाहिजे.”

“मी कायद्याला मानतो मात्र कायद्यासमोर पुरावे सादर करणाऱ्या तपास संस्था मोदींचे तळवे चाटत आहे. या संस्था मोदी सरकार जे सांगेल तेच करत आहे. आधी 6 डिसेंबर हा काळा दिवस पाळला जायचा, आता त्यापेक्षा अधिक काळा दिवस भारतात आला आहे. ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांच्याविरोधात तपास संस्थांना आज पुरावेच मिळत नाहीत, हे दुर्दैव आहे,” असंही आझमी यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Babri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

Babri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

Babri Masjid Demolition : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 28 वर्षात नेमकं काय घडलं?

Abu Azmi criticize Modi Government and CBI after Babri Verdict

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.