Yashomati Thakur : ‘तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवणं एका डॉक्टरला शोभत नाही’, यशोमती ठाकूरांचा बोंडेंवर पलटवार

अनिल बोंडे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत. अनिल बोंडेंचा अमरावतीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिलीय. ठाकूर आज मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

Yashomati Thakur : 'तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवणं एका डॉक्टरला शोभत नाही', यशोमती ठाकूरांचा बोंडेंवर पलटवार
Anil Bonde and Yashomati ThakurImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 6:35 PM

मुंबई : अमरावतीच्या अचलपूर दंगलीवरुन (Achalpur Violence) जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते आमी माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी दंगल यशोमती ठाकूर यांनीच भडकवल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यावर आता यशोमती ठाकूर यांनीही बोंडेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “आपली मूलं परदेशात पाठवायची व इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, असं करणं एका डॉक्टरला शोभत नाही” असा उपाहासात्मक टोला ठाकूर यांनी बोंडेंना लगावलाय. त्याचबरोबर अनिल बोंडे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत. अनिल बोंडेंचा अमरावतीत (Amravati) तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिलीय. ठाकूर आज मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आरोपांना यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिले आहे. यावेळी ठाकूर म्हणाल्या की, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अनिल बोंडे भाजपामध्ये गेले आणि पराभूत झाले. तेव्हापासून त्यांच्या डोक्यावर फरक पडल्याचे दिसत आहे. अनिल बोंडे अतिशय विक्षिप्तपणाने बोलले आहेत. त्यांच्या डोक्यावर थोडा फार फरक झाल्याचा दिसतोय. मागच्यावेळी जेव्हा दंगल झाली, त्यावेळी लोकांना त्यांनी उद्युक्त केले होते आणि आता या ही वेळेला ते काहीही बोलत असून लोकांना भडकवत आहेत. अमरावतीमध्ये अस्वस्थता, अशांतता पसरविण्याचे काम करीत आहेत. अमरावतीमधला सलोखा कायम राहिला पाहिजे. जनता यांना माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘शांत झालेली अमरावती अशांत करण्यासाठी प्रयत्न’

आपल्या अमरावतीमधील सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचे काम बोंडे यांच्यासारखी मंडळी करीत आहेत. मात्र आपण हे सलोख्याचे वातावरण आहे तसेच राहायला हवे असा प्रयत्न करूया. शांत झालेली अमरावती अशांत करण्यासाठी ते इतरांना उद्युक्त करत आहेत. राहिला प्रश्न अनिल बोंडे यांचा तर ते कुणाच्या खुंट्याला बांधले गेले आहेत हे जनतेला माहित आहे. आपली मूलं परदेशात पाठवायची आणि इथल्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवायची, हे करणं एका डॉक्टरला शोभत नाही, असा टोलाही ठाकूर यांनी त्यांना लगावला.

“जिधर बम, उधर हम”, राज ठाकरेंवरही टिकास्त्र

राज ठाकरे जे पण काय करतात, ते अतिशय चुकीचे करीत आहेत. राज ठाकरे यांनी असे करणेही चुकीचेच आहे. महाराष्ट्र राज्यात सलोख्याचे आणि शांतीचे वातावरण राहावे यावर राज ठाकरे यांनी बोलले पाहिजे. राज ठाकरे “जिधर बम, उधर हम” अशा गोष्टी करीत आहेत. तेव्हा त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही. ते अशा गोष्टी का बोलत आहेत त्याची सर्व सामान्य जनतेला माहिती आहे. भाजपाची सी टीम म्हणून ते काम करीत आहेत, असा टोला त्यांनी मनसेला लगावलाय.

महागाई- बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी दंगली

देशातील महागाई, बेरोजगारी अशा महत्त्वाच्या मुद्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी केंद्रातील सरकारकडून जातीय दंगली घडविण्याचे काम मोठया प्रमाणावर सुरू आहे. हे सर्व जनतेने लक्षात घ्यायला हवे. आणि जनता या गोष्टी समजून गेली आहे. जातीय दंगलीसारख्या गोष्टी देशाच्या प्रगतीच्या यंदा येणाऱ्या आहेत. या सगळ्यांतून बाहेर पडून आपला देश, आपला युवा, आपल्या भविष्याबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

Sanjay Raut Ayodhya Visit : ‘अयोध्या ही आमची पायवाट, तारीख लवकरच जाहीर करु’, संजय राऊतांचा दावा; मनसे, भाजपवर पलटवार

Devendra Fadnavis : ‘आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.