Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले

हिंदुत्त्वाचा विजय झाला, 'श्रीं'नी सरकारचा अहंकार घालवला, असे तुषार भोसले म्हणाले. (Tushar Bhosale Comment on Temple Reopen decision)

हिंदुत्त्वाचा विजय झाला, 'श्रीं'नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले
राज्यातील ठाकरे सरकार हे मोगलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळं सरकार असल्याची टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे.
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 4:30 PM

मुंबई : येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यावर भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी महाविकासआघाडीला टोला लगावला. हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला, असे तुषार भोसले म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी याबाबची प्रतिक्रिया दिली. (Tushar Bhosale Comment on Temple Reopen decision)

“मी या निर्णयाचं स्वागत करतो. गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील भाविकांनी जो प्रतिसाद दिला. तसेच यासाठी जी आंदोलन केली, या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. हिंदुत्वाचा विजय झाला आणि सरकारचा अहंकार अखेर त्यांना घालवावा लागला,” असे तुषार भोसले म्हणाले.

“अहंकार घालवण्याची ताकद मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रींची इच्छाच होती. त्यांनी तो घालवला. आणि पाडव्याच्या मूहूर्तावर मंदिर उघडली गेली. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे,” असेही ते म्हणाले.

“मुख्यमंत्री दिवाळीनंतर मंदिर उघडणार होते, मात्र आमच्या दबावामुळे त्यांना दिवाळीत मंदिर उघडावी लागली आहेत,” असेही त्यांनी म्हटलं.

मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी 

येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र प्रार्थनास्थळ खुली केल्यानंतर भाविकांना काही नियमावली पाळणे गरजेचे असणार आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे.(Tushar Bhosale Comment on Temple Reopen decision)

संबंधित बातम्या : 

Temple Reopen | राज्यातील मंदिर सोमवारपासून उघडणार, पण ‘हे’ नियम सक्तीचे

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मंदिरे सुरु करण्याच्या भाजपच्या दबावाला पडले नाहीत: प्रताप सरनाईक

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.