Sunny Deol Corona | अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओलला कोरोनाची बाधा

बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Actor Sunny deol Tested Corona Positive) 

Sunny Deol Corona | अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओलला कोरोनाची बाधा
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 7:54 AM

शिमला : बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशातील आरोग्य सचिवांनी याबाबतची माहिती दिली. सनी देओल हे पंजाबच्या गुरुदासपूर या मतदारसंघाचे भाजप खासदार आहेत. (Actor Sunny deol Tested Corona Positive)

हिमाचल प्रदेशातील आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल खासगी कामानिमित्त हिमाचल प्रदेशात आले होते. ते कुलू जिल्ह्यातील मनालीजवळ एका फॉर्म हाऊसमध्ये थांबले होते.

काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर आराम करण्यासाठी ते मनालीतील फॉर्म हाऊसमध्ये आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राहत होते. मात्र उद्या 3 डिसेंबरला सनी देओल हे एका मित्रासोबत मुंबईत परतणार होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सनी देओलने भाजपात प्रवेश केला. त्याला पंजाबमधील गुरदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना इथून खासदार होते. पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत इथून काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी भाजपने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी सनी देओलला मैदानात उतरवलं होतं. या मतदारसंघातून सनी देओलने घसघशीत मतांनी विजय मिळवला.  (Actor Sunny deol Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

भाजप प्रवेशानंतर सनी देओलचा पहिलाच रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी

सनी देओलचा उमेदवारी अर्ज दाखल, खरं नाव समोर, संपत्ती किती?

Non Stop LIVE Update
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.