राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या लेटर वॉरमध्ये कंगनाची उडी, ठाकरे सरकराला ‘गुंडा’ची उपमा
राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. (Kangana Ranaut on CM uddhav thackeray)
मुंबई : राज्यातील मंदिर सुरु करण्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात या मुद्द्यावरुन लेटर वॉर सुरु आहे. यात आता अभिनेत्री कंगना रनौतनेही उडी घेतली आहे. “सोनिया सेना ही बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे,” अशी टीका कंगना रनौतने ठाकरे सरकारवर केली आहे. (Kangana Ranaut on CM uddhav thackeray)
माननीय राज्यपालांनी गुंडा सरकारला प्रश्न विचारला हे ऐकून फार छान वाटलं. या गुंडांनी राज्यातील बार, रेस्टॉरंट्स सुरु केले आहेत. मात्र मंदिर अद्याप बंदच ठेवली आहेत. सोनिया सेनाही ही बाबर सेनेपेक्षा वाईट वागणूक देत आहे, असे ट्विट कंगना रनौतने केलं आहे. कंगनाने अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारला गुंडा सरकारची उपमा दिली आहे.
Nice to know Gunda government is being questioned by Honourable Governor sir, Gundas have opened bars and restaurants but strategically keeping temples shut. Sonia Sena is behaving worse than Babur Sena …. #Governor https://t.co/qgLDxB9erd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 13, 2020
नेमकं प्रकरणं काय?
राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं सांगितले.
राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाचा उल्लेख केला होता. राज्यापालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या वक्तव्याचा धागा पकडत राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं आहे.
राज्यपालांच्या पत्रात काय?
“तुम्ही एक जूनला पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाऊन या शब्दाला केराची टोपली दाखवलीत. त्यामुळे लॉकडाऊनला वैतागलेल्या जनतेच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. दुर्दैवाने चार महिन्यांनंतरही प्रार्थना स्थळांवरील बंदी कायम राहिली. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि बीचवर जाण्यास परवानगी दिली असताना देव-देवता लॉकडाऊनमध्ये असणं, यासारखा विरोधाभास नाही.” असा टोला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे लगावला होता. (Kangana Ranaut on CM uddhav thackeray)
संबंधित बातम्या :
होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे : आशिष शेलार
राज्यपाल कोश्यारींवर आधी मुख्यमंत्री कडाडले, आता ओवेसीही भडकले!