तू गरीब होने का नाटक मत कर ऐ दोस्त… उर्मिला मातोंडकरांचा कोणाला चिमटा?

"तू गरीब होने का नाटक मत कर ऐ दोस्त.. मैंने तुझे देखा है पेट्रोल भराते हुऐ!!" असं ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केलंय (Urmila Matondkar Petrol Diesel Rates)

तू गरीब होने का नाटक मत कर ऐ दोस्त... उर्मिला मातोंडकरांचा कोणाला चिमटा?
उर्मिला मातोंडकर
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 4:16 PM

मुंबई : सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालक संताप व्यक्त करत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही मोदी सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. त्यातच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी ट्विटरवरुन चिमटे काढले आहेत. (Actress Urmila Matondkar pinches Modi Govt at Petrol Diesel Rates)

“तू गरीब होने का नाटक मत कर ऐ दोस्त.. मैंने तुझे देखा है पेट्रोल भराते हुऐ!!” असं ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारला कानपिचक्या लगावल्या आहेत.

गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढत आहेत. रविवारी इंधनदरांमध्ये थोडे फार स्थैर्य पाहायला मिळाल्यानंतर आज पुन्हा दरांमध्ये 30 पैशांनी वाढ झाली. (Urmila Matondkar Petrol Diesel Rates)

…म्हणूनच ते कर वसूल करतात: धर्मेंद्र प्रधान

आम्ही OPEC & OPEC plus (तेल उत्पादक देश) यांच्याशी सतत संपर्कात आहोत. आम्ही त्यांना आवाहन करत आहोत की, किमती वाढवू नये. येत्या काळात यात बदल होणार आहेत. कोरोनामुळे सरकारचे बजेट लक्षणीय वाढले आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, याशिवाय भांडवली निधीतही 34 टक्के वाढ केलीय. सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणूनच ते कर वसूल करतात. केंद्र आणि राज्य दोन्ही पेट्रोल डिझेलवर कर आकारतात. राज्य सरकारही यावेळी खर्च वाढवत आहे, त्यामुळे त्यालाही अधिक कराची गरज आहे. अर्थमंत्री या समस्येवर तोडगा काढतील, अशी आशा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या –

…म्हणून पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचलं; पेट्रोलियम मंत्र्यांनीच सांगितलं ‘कारण’

शरजील उस्मानीच्या विधानावर उर्मिला मातोंडकरांचं मोठं भाष्य, शेतकरी आंदोलनावरही रोखठोक मत

(Actress Urmila Matondkar pinches Modi Govt at Petrol Diesel Rates)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.