AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो : अजित पवार

अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचं कौतुक केलं.

अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो : अजित पवार
Ajit Pawar_Aditi Tatkare_Sunil Tatkare
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 11:39 AM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, श्रीवर्धन ( रायगड ) : अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचं कौतुक केलं. अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे कामं करुवून घेतात, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार आज रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर आहेत. (Aditi Tatkare appreciated by Ajit Pawar)

अदिती माझी मुलगी, पै पै कामासाठी खर्च झाले पाहिजे, असा प्रेमल दम यावेळी अजित पवारांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ब्रिटिशांचं काम टिकतं आपलं का टिकत नाही, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

अदिती तू मला बोलवलंस, पण काम चांगलं झालं पाहिजे, नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. मी स्पष्ट बोलतो, असं अजित पवार म्हणाले.

कोकणात पाच वर्षात चार वादळं

पाच वर्षात चार वादळं आली. सरकार पाठिशी आहे, केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीनपट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कोरोना कसा अटॅक करेल सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आतताईपणा जीवावर बेततोय, असं अजित पवारांनी सांगितलं.

कुणालाही वाटलं नव्हतं की मविआची स्थापना होईल आणि आपलं सरकार येईल. पण कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला. 14 महिने झाले राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कमी झाला, असं त्यांनी नमूद केलं.

100 वर्षांची झाडं पडली

चक्रीवादळाने बाप-दादांनी लावलेली झाडं कोलमडून पडली. मात्र आता पावसाळ्यात चौपट झाडं लावा. 100 वर्षापूर्वीच्या झाडांसाठी हेरीटेज ट्री संकल्पना राबवा. ही झाडं तोडता येणार नाहीत, त्याला कायद्याचं संरक्षण असेल, असं अजित पवारांनी सांगितलं.

वाऱ्याच्या वेगाला टिकणाऱ्या झाडांची वानवा आहे. लॅंडस्केपिंग करताना झाडांचा विचार व्हायला हवा. बीचवर गझीबो टेंट लावले जाणार, असं अजित पवार म्हणाले.

पवारांनी अनेक वादळं पाहिली

शरद पवारांनी अनेक हल्ले , वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं. ही भूमी ऐतिहासिक आहे. या भूमीला छत्रपतींचा वारसा आहे, महाडचं चवदार तळंही इथेच आहे. सी डी देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास. त्यामुळे इथे आल्याचा आनंद आहे, रायगडावर सुवर्णतुला 4 जूनला झाली, आजचा दिवस महत्वाचा. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, असं अजित पवार म्हणाले.

कोकणाबद्दल पवारांनाही प्रेम. या परिसराचा कॅलिफोर्निया करावा, अशी इच्छा आहे. राज्य सरकारने निधी देण्याचं काम केलं. मुंबई गोवा महामार्गावर फॉरेस्टची अडचण आहे. काम रखडलंय, आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करतोय, लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात साताऱ्यात एकाच दिवशी 40 किलोमिटरचा रस्ता तयार केला, असं अजित पवारांनी सांगितलं.

कोकणात 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलं तर शून्य टक्के व्याजदर असेल. राज्य सरकार शून्य टक्के व्याजदराने पैसे देईल असं अजित पवार म्हणाले.

प्रीवेडिंगवाल्यांना अडवू नका

प्रीवेडिंग अर्थात लग्नापूर्वी फोटोशूटला श्रीवर्धनला अनेक लोक येतात. पण त्यांना इथे रोखलं जातं, ही प्रकरणं पोलीस ठाण्यात जातात. पण तसं करु नका. त्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य, संरक्षण द्यायला हवं. नवं ऊत्पन्नाचं साधन तयार होईल. इथं चांगली वागणूक द्या की त्यांनी हनिमूनलाही इथेच आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या 

त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत, अजितदादांचा प्रेमळ दम

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.