आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा? सुरक्षारक्षक आहेत पण गाड्या नाहीत!
आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
रत्नागिरी : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. मात्र आजच्या त्यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपण झाल्याची चर्चा आहे. कारण आदित्य यांच्या सुरक्षेसाठी (Aditya Thackeray Security) राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिलेत. पण त्यांना गाड्या दिलेल्या नाहीत.या दौऱ्यासाठी सुरक्षा रक्षक खासगी वाहनाने आलेत. झेड सुरक्षेतील सुरक्षा रक्षकांना गृहविभाग गाड्या देतं. पण या आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांना गाड्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे जर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अशी चर्चा सध्या होतेय.