मैदान कौंनसा भी हो… साथ में खेलना है और साथ जितना है… आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

हे सरकार घटनाबाह्य आहे; 40 लोक गद्दार आहेत. आता तरी निवडणुका घ्या आता कशाला घाबरत आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

मैदान कौंनसा भी हो... साथ में खेलना है और साथ जितना है... आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 9:59 AM

 रोहा, रायगडः मैदान कौंनसा भी हो साथ में खेलना है ओर साथ मे जितना है. मातीत खेळण्याची मजा वेगळीच असते; आताच्या काळात आर्टिफिशियल मैदानं आहेत. आपण आपली माती आपली माणसं म्हणतो, तेच चित्र मैदानात असतं, असं वक्तव्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं. रायगड जिल्ह्यातील रोहा आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. खोखो क्रिडापटूंना बोलताना आदित्य ठाकरेंनी प्रोत्सहनपर भाषण केलं तसंच राजकीय शत्रूंवर टीकाही केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला उपस्थित होते.

गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले तसे कर्नाटक निवडणुकीसाठी राज्यातील गावं पळवतील, अशी सडकून टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. मातीतल्या खेळांना महत्व दिलं पाहिजे, मैदाने वाचवली पाहिजे असं मत आदित्य ठाकरे यानी व्यक्त केलं.

राज्यात विविध गटांकडून दबावतंत्र सुरु आहे, यावर बोट ठेवताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योग, राजकीय असेल, देशाला एकत्र आणण्याचं काम खेळासारखा दुसरं काही नाही. महाराष्ट्राला प्रत्येक बाजूने दाबण्याचा प्रयत्न करत आहे. उद्योग, गावे, जिल्हे दुसऱ्या राज्यात जात आहेत. तसेच महापुरुषांचा अपमान देखील होत असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या रोह्यात बल्क ड्रग प्रकल्प आणणार होतो दुसऱ्या राज्यात गेला. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार बसल्यानंतर पाच प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. बल्क ड्रक प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. बेळगाव बाबत हे सरकार बोलत नाही घाबरट सरकार आहे. असे अनेक विषय आहेत, महिला अत्याचार, शेतकरी असे अनेक प्रश्न असून दुसरं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. हे राजकारण आहे. हे राजकारण दूषित करायचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी देशातील विधानसभा निवडणूक निकालांवर भाष्य केलं. सर्व विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, या विजयानंतर आता तरी महाराष्ट्रात निवडणुका घेतील. हे सरकार घटनाबाह्य आहे; 40 लोक गद्दार आहेत. आता तरी निवडणुका घ्या आता कशाला घाबरत आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.